serials

लेक माझी दुर्गा मालिकेतील मराठी अभिनेत्रीचं शाही थाटात नुकतंच झालं लग्न …लग्नाचे फोटो होत आहेत व्हायरल

मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. बऱ्याचशा कलाकारांनी लग्नगाठ बांधली असून काही कलाकार लग्नाच्या गाठी बांधण्याच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिच्याही लग्नाचा बार उडणार आहे. हा लग्नसोहळा होण्यागोदरच आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे राजेशाही थाटात लग्न पार पडले आहे. ही अभिनेत्री आहे वरदा पाटील. वरदा पाटील हिने आजवर मालिका तसेच नाटकातून प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत. एका नवीन अध्यायाला सुरुवात असे म्हणत वरदाने प्रणय पटेल सोबत लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळत आहे. काल सोमवारी या लग्नाचा सोहळा बडोदा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे पार पडला. वरदाने तिच्या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

pranay patel and varda patil wedding photos
pranay patel and varda patil wedding photos

त्यावर तिच्या चाहत्यांनी तसेच मराठी सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. वरदाने तिच्या लग्नसोहळ्यात लाल रंगाचा डिझायनर घागरा परिधान केला होता तर प्रणयने सफेद रंगाचा गोल्डन जरी असलेला शेरवानी परिधान केला होता. वरदा आणि प्रणयचे हे लग्न लक्ष्मी विजय पॅलेसच्या ठिकाणी पार पडले त्यामुळे या लग्नाचा थाट राजेशाही थाटाप्रमाणेच होता. प्रणय पटेल हा वाईल्डलाईफ फिल्ममेकर आहे. देशविदेशात जाऊन तो वाईल्डलाईफ फोटोग्राफीची आवड जोपासतो. सोशल मीडियावर त्याच्या या फोटोग्राफीचे १ लाख ३७ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर वरदा पाटील ही मराठी मालिका अभिनेत्री असून तिने ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारलेली होती.

varda patil and pranay wedding photos
varda patil and pranay wedding photos

पण काही कारणास्तव तिने या मालिकेतून काढता पाय घेतला होता. २०१७ साली वरदाने ‘श्रावण क्वीन’ या सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेची ती विजेती ठरली होती. पुण्यश्लोक अहिल्याबाई या लोकप्रिय मालिकेतूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कॉलेजमध्ये असताना वरदाने नाटकातून काम केले होते. यातूनच तिला सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची ईच्छा निर्माण झाली. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर वरदाने अनेक जाहिरातींमध्ये मॉडेलिंगचे काम केले. लेक माझी दुर्गा या मालिकेनंतर ती तमाशा या दोन अंकी नाटकात झळकली होती. अशातच वरदाने लग्न करण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. तूर्तास प्रणय पटेल आणि वरदा पाटील यांना आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button