जेष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या नातवाचं थाटात पार पडलं लग्न.. आनंदाच्या क्षणी पतीच्या आठवणीत झाल्या भावुक

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या घरात नुकतेच एक लग्नकार्य पार पडलं आहे. उषा चव्हाण यांचा धाकटा नातू रोहन कडू देशमुख नुकताच विवाहबद्ध झाला आहे. या लग्नाचे काही खास क्षण उषा चव्हाण यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर आता सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उषा चव्हाण यांनी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय कडू देशमुख यांच्याशी लग्न केले होते. हृदयनाथ कडू देशमुख हा त्यांचा मुलगा देखील उद्योजक असून रोहित आणि रोहन अशी दोन अपत्ये त्यांना आहेत. काहीच वर्षांपूर्वी उषा चव्हाण यांचा नातू रोहितचे लग्न पार पडले होते त्यानंतर आता त्यांचा धाकटा नातू रोहन देखील विवाहबद्ध झाला आहे. रोहित आणि रोहन या त्यांच्या दोन्ही नातवंडांना अभिनयाची आवड आहे.

बालकलाकार म्हणून रोहितने दादा कोंडके यांच्याच चित्रपटातून आज्जी उषा चव्हाण सोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तर रोहन हा त्यांचा धाकटा नातू देखील कला क्षेत्रात येण्यास सज्ज झाला आहे. नातवाच्या लग्नसोबतच उषा चव्हाण यांनी आणखी एक गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली पाहायला मिळत आहे. लवकरच हृदयनाथ कडू देशमुख हे एक नवीन अल्बम घेऊन येत आहेत. याचे दिग्दर्शन आणि निर्मिती ते स्वतः करणार आहेत. रोहन आणि उषा चव्हाण यांना या अल्बममध्ये प्रथमच एकत्रित झळकण्याची संधी मिळणार आहे.या अल्बमच्या माध्यमातून ते रोहनला कलासृष्टीत लॉन्च करत आहेत. त्यामुळे हा एक सुखद क्षण अनुभवण्यासाठी उषा चव्हाण खूपच उत्सुक असलेल्या पाहायला मिळत आहेत.

दरम्यान रोहन कडू देशमुख याला अभिनयाची आवड आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच ऍक्टिव्ह देखील आहे. काही दिवसांपूर्वी रोहनने उषा चव्हाण सोबतचे काही व्हिडीओ त्याच्या युट्युब चॅनलवर शेअर केलेले पाहायला मिळाले. त्यावेळी आज्जीसोबतचे नातवाचे हे बॉंडिंग सगळ्यांना खूप आवडले होते. उषा चव्हाण या व्हिडिओतून आठवणीतले रंजक किस्से सांगताना पाहायला मिळाल्या होत्या. तेव्हा आज्जी आणि नातवाचे हे जुळून आलेले बॉंडिंग सर्वानाच खूप भावले होते. पण आता ही आज्जी नातवाची जोडी अल्बमच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या नवीन प्रवासानिमित्ताने उषा चव्हाण यांनी नातवाला यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ केल्या आहेत. तर आनंदाच्या क्षणी पतीच्या आठवणीत भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. दरम्यान हा अल्बम कधी लॉन्च होणार याचीच आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. लग्नानिमित्त आणि कला सृष्टीतील पदार्पणसाठी रोहन कडू देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!.