news

शुभंकर तावडे या सुंदर सोशल मीडिया स्टारच्या प्रेमात… सुनील तावडेच्या खास कमेंटने वेधलं लक्ष

मराठी चित्रपट अभिनेता शुभंकर तावडे प्रेमात पडला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही वेळापूर्वीच शुभंकरने एक खास फोटो शेअर केला आहे. त्यावर अमृता खानविलकर सह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अर्थात यामुळे शुभंकर प्रेमात असल्याची चर्चा जाहीर झाली आहे. अभिनेते सुनील तावडे यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभंकरनेही अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्याचे ठरवले. नाटक, चित्रपट या माध्यमातून शुभंकर सहाय्यक भूमिका साकारू लागला. पण कालांतराने तो चित्रपटाचा नायक म्हणून ओळख मिरवू लागला. वेड या चित्रपटात शुभंकरने रितेश देशमुखच्या मित्राची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली.

Shubhankar Tawde and SAMEEKSHA TAKKE in love
Shubhankar Tawde and SAMEEKSHA TAKKE in love

अगदी रिंकू राजगुरू, संस्कृती बालगुडे सोबत त्याला मुख्य भूमिकेसाठी विचारणा होऊ लागली. पण आता हाच शुभंकर अभिनेत्रीच्या नाही तर एका सोशल मीडिया स्टारच्या प्रेमात पडला आहे. नुकताच शुभंकरने त्याच्या गर्लफ्रेंड सोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. त्याची ही गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आणि युट्युबर समीक्षा टक्के आहे. समीक्षा टक्के ही सोशल मीडिया स्टार आहे. क्रिकेट खेळाचीही तिला विशेष आवड आहे. इन्स्टाग्रामवर समीक्षाचे ६ लाख ५६ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. दीपिका पदुकोण, विराट कोहली अशा स्टार्स सोबत तिला जवळून भेटण्याची संधी मिळाली आहे. तिच्या व्हिडिओला लाखोंचे व्युव्ह्ज मिळत असतात त्यामुळे अल्पावधीतच समीक्षा सोशल मीडियावर ओळखली जाऊ लागली.

shubhankar tawade girlfriend sameeksha takke
shubhankar tawade girlfriend sameeksha takke

पण आता हीच समीक्षा मराठी अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे. अभिनेते सुनील तावडे यांनी या दोघांच्या फोटोवर ‘ रब ने बना दी जोडी’ अशी खास कमेंट करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मिताली मयेकर, अमृता खानविलकर, ज्ञानदा रामतीर्थनकर, अनघा अतुल, प्रियदर्शनी इंदलकर, हृता दुर्गुळे अशा सेलिब्रिटींनी खास कमेंट करत दोघेही प्रेमात असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता हे दोघेही लग्न कधी करतायेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button