serials

हा शहाणपणा मला नका शिकवू….सुबोध भावे ट्रोलर्सवरच भडकला

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. ८ जुलै पासून रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत सुबोध भावे AI टेक्नोलॉजीच्या माध्यमातून तरुण दिसणार आहे. त्यामुळे तो यातून दुहेरी भूमिका साकारत असल्याचे दिसून येते. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार सुबोधची नायिका बनणार आहे. नुकतीच या मालिकेच्या निमित्ताने एक पत्रकार परिषद भरवण्यात आली होती. तेव्हा मालिकेच्या निर्मिती बद्दल अनेक खुलासे यातून करण्यात आले. दरम्यान सुबोध भावे या मालिकेत दुहेरी भूमिका साकारत असल्याने त्याच्यावर टीका केली गेली. AI हे तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या कलाकाराला ही संधी द्यायला हवी होती अशी चर्चा पाहायला मिळाली होती. काही कलाकारांनी सुद्धा यावर आक्षेप घेतला होता.

sobodh bhave in new serial tu bhetashi navyane
sobodh bhave in new serial tu bhetashi navyane

त्याच्याजागी आणखी एका कलाकाराला ही संधी द्यायला हवी सुबोधने मात्र त्या कलाकारांच्या पोटावर पाय दिला अशी टीका त्याच्यावर केली गेली. या टीकेवर उत्तर देताना सुबोध ट्रोलर्सवर जाम भडकलेला पाहायला मिळाला. पत्रकार परिषदेत हा विषय निघाला तेव्हा सुबोध स्पष्टपणे म्हणतो की, ” मला वाटतं की मी हे असं केल्याने कुणाच्या पोटावर पाय आलेला नाहीये. ही लहानपणीची भूमिका करण्यासाठी कोणाला घ्यायला हवं होतं?. नवीन कलाकारांच्या पोटावर पाय असं जेव्हा म्हणतात त्यांना मला सांगायचंय की मराठी इंडस्ट्रीत सध्या ३५ मालिका चालू आहेत. त्यातली ही एक मालिका आहे ज्यात मी काम करतोय. याचा अर्थ त्या ३४ मालिकेतील कलाकारांच्या पोटावर मी पाय दिलेला नाही.

subodh bhave ai serial
subodh bhave ai serial

मी एक अभिनेता आहे आणि जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मी अभिनय करत राहणार आहे. त्यामुळे इंस्टा आणि फेसबुकवर असलेल्यांनी मला शहाणपणा शिकवू नका. मी अनेक गोष्टींचा त्याग करून कलाकार म्हणून बनायला आलो आहे. माझे काही व्यवसाय ,दुकान , बिल्डर नाही , नाही मी पॉलिटिक्समधून पैसे मिळवत. माझं पोट यावर अवलंबून आहे , माझं रक्त, जीव ह्यावरच आहे. आणि मी ते करतच राहणार त्यामुळे नवीन कलाकारांच्या पोटावर पाय हे जाऊन कोणालातरी शिकवा.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button