मालिकेतून नेमकं काय शिकावं हा मुद्दाच चुकीचा आहे. कारण मालिकेत कुरघोड्या, भांडणं, वाद, एकमेकांचा जीव घेणं, हिंसा अशा गोष्टी दाखवल्या जातात. त्यामुळे त्या फक्त एक मनोरंजनाचे माध्यम आहे असे चालून पुढे जावे असे मत व्यक्त करण्यात येते. पण एखादी मालिका आणि त्यातील पात्र प्रेक्षकांना विशेष पसंतीस पडतं. त्यामुळे साहजिकच या मालिकेची उत्सुकता वाढत जाते. झी मराठीची अप्पी आमची कलेक्टर या मालिकेनेही प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका निरोप घेणार असल्याने मालिकेत सकारात्मक बदल घडून येत होते. एका निर्णायक वळणावर आल्यानंतर ही मालिका संपवली जाणार होती. पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मालिका पुढे चालू ठेवण्यात आली. गेल्या आठवड्यात ही मालिका प्रेक्षकांना निरोप देणार होती पण सावळ्याची जणू सावली मालिकेमुळे वेळेत बदल करून ही पुढे चालू ठेवण्यात आली.
त्यामुळे मनी मावशी, रुपाली आणि आर्या नेमलेले पाहायला मिळाले असतानाच पुन्हा यांची कटकारस्थानं सुरू झाली. त्यात आता भर म्हणून की काय संकल्पची पुन्हा एकदा एन्ट्री करण्यात आली. संकल्प ढोबळे हे पात्र गायब झाले होते पण आता हे पात्र मालिका पुढे सुरू राहिल्याने सक्रिय झाले आहे. त्यात अमोल मृत्यूच्या दाढेत असताना त्याच्या आजारपणाबद्दल तो सगळ्यांना अनभिज्ञ ठेवत आहे. हे कमी म्हणून की काय तो अमोलच्या शाळेत जाऊन आई बाबांपासून आजारपण लपवायचं कसं हे शिकवत आहे. “”तुम्हाला जर काही झालं ना तरी माँला काहीच सांगायचं नाही”असे म्हणत तो त्याचा प्लॅन सक्सेसफुल करताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेचा हा सीन संताप आणणारा ठरला आहे. लहान मुलांना तरी असं शिकवायला नको…घरच्यांपेक्षा बाहेरच्या माणसांवर विश्वास कसा ठेवायचा हे या मालिकेत दाखवले जात आहे.
अमोल हा लहान मुलगा आहे पण त्याला कुठलीही सुरक्षा नसताना कोणीही त्याला शाळेच्या गेटवर भेटायला कसं येतं?…असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. अमोल सहज कोणावरही विश्वास ठेवतो आणि त्यांच्यासोबत कुठेही जायला तयार होतो तेही आई बाबांना माहीत होऊन न देता. या गोष्टींचा विचार केला जावा असे मत प्रेक्षकांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. एकदा संपत आलेली मालिका पाणी घालवून वाढवली जात असेल तर ती बंद केलेलीच बरी अशी टीका या मालिकेच्या बाबतीत केली जात आहे.