मालिकेतून तडकाफडकी काढले जवळचे नातेवाईकच टोमणे मारतात.. माझ्या आईला तर एका नातेवाईकाने फोन करून सांगितलं कि
ठरलं तर मग ही स्टार प्रवाहवरची मालिका प्रसारित झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. त्याचमुळे या मालिकेने तिचे नंबर एकचे स्थान टिकवून ठेवले आहे. या मालिकेमुळे कलाकारांमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आलेलं आहे. मालिकेत प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सेटवर कलाकारांच्या बॉंडिंग बद्दल भरभरून बोलते. प्राजक्ता कुलकर्णी , जुई गडकरी, मोनिका दबडे यांच्याशी तिची छान मैत्री झाली आहे. खरं तर प्रियाची भूमिका प्रियांकाच्या आयुष्याला एक नवे वळण देणारी ठरली आहे. प्रियांकाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण साथ दे तू मला या स्टार प्रवाहच्या मालिकेतून तिला तडकाफडकी काढून टाकण्यात आले होते.
खरं तर लीड रोल करायला मिळाला यासाठी प्रियांका खूपच खुश होती पण एक दिवस अचानक तुम्हाला मालिकेतून काढून टाकलं असं सांगताच प्रियांकाला खुप रडू कोसळले होते. “आता आपण मालिकेत दिसत नाही म्हणून लोक सतत विचारत होते. तो काळ माझ्यासाठी , माझया आईबाबांसाठीही खूपच कठीण होता. पण ठरलं तर मग मालिकेने ते काळ पुसून टाकला. आता मी स्टार प्रवाहच्याच मालिकेतून काम करतीये हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे” असे प्रियांका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगते. ठरलं तर मग या मालिकेतील प्रियाच्या भूमिकेमुळे प्रियंकाला नातेवाईकांचे टोमणे देखील खावे लागत आहेत. प्रियाची भूमिका विरोधी आहे त्यामुळे अनेकदा प्रेक्षकांकडून तिला नकारात्मक प्रतिक्रिया मिळत असतात. पण जेव्हा नातेवाईकांना आपण कसे आहोत हे माहीत असूनही ते असे टोमणे मारतात त्यांना प्रियांका एकच उत्तर देऊ इच्छिते. ती म्हणते की, ” माझ्या आईला एका नातेवाईकाने फोन केला होता. आता मी त्यांचं नाव नाही सांगू शकत.
पण ते आईला म्हणाले होते की, “प्रियंकाला तिच्या स्वभावाप्रमाणेच भूमिका मिळालीये. तेव्हा मला असं झालं होतं की अरे मी कुठे अशी आहे, मी कोणाचे असे पैसे चोरलेत किंवा पुरुषाला मारलंय? असं ते कसे म्हणू शकतात. काहीजण मलाही फोन करून सांगतात की, अरे तुला तर ही भूमिका करताना काहीच अवघड जात नसेल, तुला तुझ्यासारखीच भूमिका मिळालीय. हे ऐकून मला असं वाटलं की, मे हे कधी असं वागलीये. या सर्वांना मी तशी आहे असं वाटत असेल तर ऑल द बेस्ट. पण मी प्रियासारखी कधीच वागलेली नाहीये, मी माझ्या दिसण्यावरही कधी हक्क गाजवलेला नाहीये आणि कधी कुठल्याच गोष्टीवर हक्क दाखवलेला नाही. प्रिया आणि माझ्यात काहीच साम्य नाहीये.”