हे टाळता आलं असतं कारण हि गोष्टी खूप त्रासदायक आहे… सोनाली कुलकर्णीच्या नावावरून अखेर खदखद आली बाहेर

मराठी इंडस्ट्रीत आता नावातील साम्यावरून एक खदखद बाहेर काढण्यात आली आहे. इतके वर्ष नावातील साधर्म्या वरून गप्प बसून असलेली सोनाली कुलकर्णी आता मनातली ही खदखद बाहेर काढताना दिसली आहे. मराठी इंडस्ट्रीत दोन सोनाली कुलकर्णी आहेत. अर्थात या दोघींनी अभिनय क्षेत्रात एक वेगळी उंची गाठलेली आहे. जुनी सोनाली आणि नवीन सोनाली अशी प्रेक्षकांमध्ये या दोघींची ओळख आहे, पण याच नावावरून एक नवा वाद उफाळून येतोय की का असेच सोनालीच्या बोलण्यावरून जाणवू लागलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या इंडस्ट्रीत गेली अनेक वर्षे काम करते आहे.

अगदी दाक्षिणात्य, बॉलिवूड चित्रपटातही तिने तिच्या नावाची वेगळी ओळख बनवली आहे. पण तिचे एक अस्तित्व असताना सोनाली कुलकर्णी याच नावाने या नव्या सोनाली कुलकर्णीने या इंडस्ट्रीत पाऊल टाकले. त्यामुळे या नावावरून आक्षेप घेताना सोनाली कुलकर्णी हिने तिचे मत जाहीर केले आहे. सोनाली म्हणते की, “मला माझ्याच नावाचा खूप त्रास होतो. मी इतके वर्ष इंडस्ट्रीत काम करते आहे तरीही मला हे सांगावं लागतंय की मी कुठली सोनाली कुलकर्णी आहे. बॉलिवूडमध्ये आलिया भटचे एक अस्तित्व आहे. कियारा अडवाणी हिचे नावही आलिया होते. पण इंडस्ट्रीत आलिया अगोदरच असल्याने कियाराने तिच्या पदार्पणावेळी तिच्या नावात बदल केला. तिने ज्याप्रकरे तिच्यासारख्या नाव असणाऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाची काळजी घेतली तशी माझ्या नावाची काळजी घेतली असती तर बरे वाटले असते.

हे टाळता आलं असतं कारण या गोष्टी खूप त्रासदायक आहेत.” असे म्हणत सोनालीने सोनाली कुलकर्णीचे हळूच कान पिळलेले पहायला मिळत आहे. मी अगोदर असताना सोनालीने तिच्या नावात बदल करायला हवा होता असेच तिला यातून सुचवायचे आहे. सोनाली कुलकर्णीच्या या मतावर आता नवीन सोनाली कुलकर्णी हिची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ती सोनालीची मनधरणी करेल की नवा वाद उफाळून येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान या दोघीनी सोशल मीडियावर सेम नावामुळे गोंधळ होऊ नये म्हणून शब्दांमध्ये बदल केले आहेत. पण यावर सोनालीची प्रतिक्रिया काय असेल हेही महत्वाचे ठरणार आहे.