
अभिनेत्री मानसी नाईक हिने काही महिन्यांपूर्वीच परदीप खरेराला घटस्फोट दिला होता. जानेवारी २०२१ मध्ये मानसी नाईक हिने बॉक्सर असलेल्या परदीप खरेरासोबत लग्न केले होते. पण लग्नानंतर परदीपचा खरा चेहरा समोर आल्यानंतर तिने त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी त्यांच्या या नात्यात मोठा दुरावा आल्याने त्यांचा घटस्फोट होतोय अशी चर्चा पाहायला मिळाली. पण परदीपने फक्त पैशांसाठी आणि प्रसिद्धी साठी आपल्यासोबत लग्न केलय असा आरोप तिने त्याच्यावर लावला. यानंतर घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा दोघेही आपापल्या क्षेत्रात पुन्हा सक्रिय झाले.

पण आता मानसी नाईकचा हा घटस्फोटित नवरा पुन्हा एकदा बोहल्यावर चढताना दिसणार आहे. नुकताच परदीपचा मोठ्या थाटात साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे खास क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे मानसी नाईकच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मानसी नाईकला घटस्फोट दिल्यानंतर परदीप खरेरा सोशल मीडिया स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. अनेकदा तो तिच्यासोबत रील बनवताना दिसला. ही सोशल मीडिया स्टार आहे विशाखा पनवार. विशाखाचे सोशल मीडियावर ६.९ मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी तिने परदीपसाठी अख्ख थिएटर बुक केलेलं होतं. तेव्हाच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

पण आता लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकताना दिसणार आहेत. परदीप आणि विशाखाचे कुटुंबियांच्या तसेच मित्र परिवाराच्या समवेत साखरपुडा केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या लग्नाचीही तयारी सुरू झालेली आहे. यामुळे परदीप आणि विशाखावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. तर मानसी नाईकच्या चाहत्यांनी मात्र परदीपला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता तो हिलाही धोका देईल अशा कमेंटने त्याच्यावर ट्रोलिंग केलं जात आहे. यावर आता मानसी नाईकची काय प्रतिक्रिया असणार हे पाहावं लागेल.