
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. आता तर मालिकेत सुहानीची एन्ट्री झाली आहे आणि तिने मोनिकाला वैदेहीचा अपघात घडवून आणल्याप्रकरणी जाब विचारला आहे. येत्या रविवारी२४ डिसेंबर रोजी या मालिकेचा महाएपिसोड प्रसारित होणार आहे. वैदेहीचा अपघात घडवून आणण्याचे हे सत्य सुहानी मोनिकाकडे बोलून दाखवते त्यावेळी स्वराला हे ऐकून खूप मोठा धक्का बसणार आहे. आपल्या आईच्या मृत्यूचे कारण स्वराला समजले असल्याने मालिकेला धक्कादायक वपन मिळणार आहे. त्यामुळे स्वरा मोनिकाने हे कृत्य कोणाजवळ बोलून दाखवणार की मनातच ठेवणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास या मालिकेत मोनिकाची भूमिका अगोदर प्रिया मराठे हिने साकारली होती.

पण काही कारणास्तव प्रियाने या मालिकेतून काढता पाय घेतला तेव्हा या भूमिकेसाठी तेजस्विनी लोणारी हिची वर्णी लागलेली पाहायला मिळाली. मोनिकाची भूमिका ही खलनायिकेचा बाज असलेली भूमिका आहे. खरं तर तेजस्विनीने पहिल्यांदाच तिच्या या भूमिकेबद्दल आणि एकंदरीत आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल एक भाष्य केलं आहे, की तुमच्या दिसण्यावर तुमची भूमिका ठरलेली असते. अर्थात इथे दिसणं म्हणजे सुंदर, गोरेपान असावं याचा तिने मुळीच अर्थ लावलेला नाही . कारण या इंडस्ट्रीत आता हळूहळू बदल घडून येऊ लागले आहेत. सावळ्या रंगांच्या अभिनेत्रींनाही प्रमुख भूमिका साकारण्याची संधी दिली जाते. पण तेजस्विनी लोणारी हिची खंत थोडीशी वेगळी आहे. याबद्दल ती म्हणते की, ” मला माझ्या डोळ्यांमुळे सुरुवातीला खूप निगेटिव्ह भूमिका मिळू लागल्या, पण मला प्रमुख भूमिका किंवा महत्वाच्या भूमिका साकारायच्या होत्या. त्यामुळे मी खूपच चुजी मुलगी होते. की आपल्याला अशा अशा पद्धतीच्याच भूमिका मिळाव्यात. मराठी इंडस्ट्री याबाबतीत कुठेतरी मागे आहे असे मला वाटते इथे लुक्सचा जास्त विचार केला जातो, डोळे घारे आहेत तर हिने निगेटिव्हच भूमिका केली पाहिजे हे अजूनही पाहायला मिळतं. मला असे अनुभव खूपदा आले आहेत. सुरुवातीला मी या इंडस्ट्रीत दाखल झाले तेव्हा मला खूपदा निगेटिव्हच भूमिका येऊ लागल्या, तर कधी कधी ऐतिहासिक भूमिकेसाठी विचारणा होऊ लागली.

तिथे माझी इमेज बदलू नये म्हणून मी ह्या भूमिकांना नकार दिला होता. ” घाऱ्या डोळ्यांच्या नायिका नसतात अशी एक इमेज मराठी इंडस्ट्रीत तयार झालेली आहे. इथे अशा अभिनेत्रींना निगेटिव्हच भूमिकेत दाखवले जाते अशी तेजस्विनी लोणारीची खंत आहे. याचमुळे तेजस्विनीला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत खलनायिका साकारण्याची संधी मिळाली. तेजस्विनी लोणारी हिने नो प्रॉब्लेम चित्रपटातून अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरु केला होता. दोघात तिसरा आता सगळं विसरा या चित्रपटात तिने मकरंद अनासपुरे यांची नायिका साकारली होती. गुलदस्ता, चिनू, साम दाम दंड भेद अशा मोजक्या चित्रपटातून तिने काम केले आहे. पण मराठी बिग बॉसने तेजस्विनीची लोकप्रियता वाढवली. पण घाऱ्या डोळ्यांमुळे मराठी इंडस्ट्रीत आपल्याला नायिका म्हणून खूप कमी संधी मिळाली ही खंत आता तिने बोलून दाखवली आहे.