news

मधला काळ माझ्यासाठी खुप कठीण होता त्या फेजमध्ये असताना तिने मला… लग्नानंतर पियुष प्रथमच झाला व्यक्त

अभिनेता पियुष रानडे आणि सुरुची अडारकर यांचे लग्न सगळ्यांसाठीच खूप शॉकिंग होते. कारण पियुषचे हे तिसरे लग्न होते , यामुळे अनेकांनी पियुष सह सुरुचीला देखील ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. पण हे आमचं आयुष्य आहे आणि आम्ही यात खुश आहोत, ही गोष्ट दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा ती आम्ही आमच्या पद्धतीने हाताळतोय आणि यात आम्ही एकमेकांना चांगली साथ देत आहोत असे या दोघांचेही म्हणणे आहे. लग्नानंतर प्रथमच सुरुची आणि पियुषने मीडियाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी एकमेकांबद्दल भरभरून बोलले आहे. दोघांची भेट कधी झाली, कोणी कोणाला प्रपोज केलं. याबद्दलही त्यांनी इथे खुलासा केलेला पाहायला मिळाला. झी युवा वरील अंजली या मालिकेमुळे सुरुची आणि पियुष पहिल्यांदा एकत्र काम करत होते. त्याअगोदर एका फंक्शनमध्ये हाय हॅलो पुरती त्यांची तोंडओळख होती. याबद्दल पियुष म्हणतो की, अंजली या मालिकेत एकत्रित काम केलं तेव्हा आमचा सात कलाकारांचा आमचा एक ग्रुप बनला. आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. स्पेशली सुरुची माझी खूप चांगली मैत्रीण झाली.

piyush ranade and suruchi adarkar photos
piyush ranade and suruchi adarkar photos

मधला काळ माझ्यासाठी खुप कठीण होता, मी त्या एका फेजमधून जात असताना सुरुचीने मला खूप साथ दिली होती. मालिका संपल्यानंतर आम्ही जवळपास एक वर्ष भेटलो नव्हतो. पण त्या फेजमध्ये असताना तिने मला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली होती. ती खूप केअरिंग आहे मला तिने माझ्या अडचणींतून बाहेर पडण्यासाठी मदत केली, ती इंडस्ट्रीत गोड मुलगी म्हणूनच ओळखली जाते.” यानंतर कोणी कोणाला प्रपोज केलं याबद्दल पियुष म्हणतो की, ” ती एक कम्प्लिट मॅरेज मटेरिअल मुलगी आहे. आमच्यात मैत्री होती , आम्ही एकमेकांना आवडतोय हे आम्हाला जाणवत होतं. चल आपण इथे इथे फिरायला जाऊ असं म्हणण्यापेक्षा मी तिला म्हणेन की सुरुची चल आपण लग्न करू इतपत मी तिला ओळखलं होतं. या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले पण दोघेही याबद्दल एकमेकांना कधीच काही म्हणालो नाही. तीही लग्नासाठी तयार होती हे मला कळत होतं शेवटी मीच तिला लग्नासाठी विचारलं . उगाच लग्न करायचं म्हणून आम्ही नाही केलं, आम्ही डेट करायच्या भानगडीतच पडलो नाही. ती फेज आमच्यातून स्कीप झाली होती कारण आमची मैत्रीच एवढी छान होती की डायरेक्ट आम्ही आमच्या घरी लग्नाचा विषय काढला. ही गोष्ट आम्ही कुठल्याही मित्राजवळ बोलली नाही.

suruchi adarkar and piyush ranade news
suruchi adarkar and piyush ranade news

आम्हाला आमच्या गोष्टी प्रायव्हेट ठेवायला आवडतात, नाहीतर या गोष्टी बाहेर समजल्या असत्या तर आम्ही लग्न करतोय हेही एव्हाना समजलं असतं”. पियुष म्हणतो की आम्ही आमचा निर्णय घेतला तिला तो मान्य होता. ती मला जास्त ओळखते, जगाला हे सांगायची आम्हाला मुळीच गरज वाटली नाही.” सुरुची याबद्दल म्हणते की “माझ्यात खूप सहनशीलता आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टी मला माझ्या पध्दतीने हाताळायला आवडतात.घरातली जागची गोष्ट जरी इकडे तिकडे हलली की माझी खुप चिडचिड होते” असेही ती म्हणते. एकंदरीत सांगायचं तर सुरुची आणि पियुषने त्यांच्या लग्नाचा हा निर्णय अतिशय विचारपूर्वक लच घेतलेला आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेतल्यानंतरच ते ह्या लग्नाच्या गोष्टीपर्यन्त पोहोचले आहेत. त्यांचा हा निर्णय त्यांच्या घरच्यांनाही मान्य आहे म्हणूनच त्यांनी एकमेकांना समजून घेत आयुष्याची ही नवी सुरुवात केलेली पाहायला मिळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button