news

संत गजानन शेगावीचे मालिका अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न…साखरपुड्याचे फोटो होत आहेत व्हायरल

मराठी सृष्टीतील अनेक कलाकार आता लग्नाच्या गाठी बांधताना दिसत आहेत. अशातच एकापेक्षा एक रिऍलिटी शो फेम नृत्यांगना तसेच अभिनेत्री सुकन्या काळन हिचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला आहे. सुकन्याने तिचा बॉयफ्रेंड रोशन मरार सोबत हा साखरपुडा केलेला आहे. रोशन हा मुंबईतच वास्तव्यास असून मार्केटिंग क्षेत्रात असिस्टंट मॅनेजर पदावर तो काम करत आहे. सुकन्या आणि रोशनच्या साखरपुड्याला कुशल बद्रिके त्याच्या पत्नीसह उपस्थित राहिला होता. तर अभिनेत्री तेजा देवकर हिनेही सुकन्याच्या साखरपुड्यात नाचून धमाल केलेली पाहायला मिळाली. साखरपुड्याचे काही खास फोटो सुकन्याने तिच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केले आहेत.

actress sukanya kalan engagement photos
actress sukanya kalan engagement photos

सुकन्या काळण आणि रोशन मरार यांची ओळख खूप वर्षांपासूनची आहे. कॉलेजची मैत्री आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेम जुळुन आले होते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांनी या मैत्रीच्या नात्याला आता नाव देण्याचे ठरवले आहे. आणि म्हणूनच काल रविवारी त्यांचा मोठ्या थाटात साखरपुडा संपन्न झाला. सुकन्या काळन ही गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. एकापेक्षा एक या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेट केल्यानंतर सुकन्या प्रकाशझोतात आली होती. आजही वेगवेगळ्या वाहिनीवरील कार्यक्रमात तिला नृत्य सादर करण्याची संधी मिळत असते. मर्डरवाले कुलकर्णी या नाटकात सध्या एका सहाय्यक भूमिकेत पाहायला मिळत आहे. या नाटकात वैभव मांगले आणि भार्गवी चिरमुले यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

kushal badrike in sukanya kalan engagement
kushal badrike in sukanya kalan engagement

याशिवाय सुकन्या अभिनेत्री म्हणून संत गजानन शेगावीचे, एकापेक्षा एक अप्सरा आली, पांडगो इलो रे इलो, सौजन्याची ऐशी तैशी, मेनका उर्वशी, तू का पाटील अशा चित्रपट, मालिका तसेच नाटकातून सहाय्यक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मध्यंतरी सुकन्याने टॉपलेस फोटोशूट करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तिच्या या बोल्ड फोटोंवर मराठी सृष्टीतील कलाकारांनी प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले होते. तर ट्रोलर्सने तिला त्या फोटोंवरून सुनावले होते. तूर्तास सुकन्या काळण आणि रोशन मरार यांना साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button