serials

तारक मेहता फेम जेठालाल यांच्या मुलाचा लग्नसोहळा संपन्न…कर्जत मध्ये कलाकारांची जमली मांदियाळी

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. या मालिकेमुळे जेठालाल प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून जेठालाल यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू आहे. जेठालालची ही भूमिका अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारली आहे. दिलीप जोशी यांचा मुलगा रित्त्विक जोशी याचा आज लग्नसोहळा संपन्न झाला आहे. कर्जतमध्ये काही मोजक्या मित्रमंडळींच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याचा हा लग्नसोहळा पार पडला. रित्त्विक जोशी हा अभिनेता असून त्याने उन्नती गाला हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. उन्नती गाला ही देखील अभिनेत्री आहे . रित्त्विक आणि उन्नतीच्या लग्नसोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल व्हायरल होत आहे. त्यात दिलीप जोशी प्रकाशझोतात आलेले पाहायला मिळाले. खरं तर दिलीप जोशी यांनी त्यांच्या मुलाचे लग्न मिडियापासून लपवून ठेवले होते. लग्नाचे फोटो व्हायरल होऊ नयेत याची त्यांनी काळजी घेतली होती.

tarak mehta actor dilip joshi son wedding photos
tarak mehta actor dilip joshi son wedding photos

रित्त्विकच्या लग्नात तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावलेली पहायला मिळाली. दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी तिच्या मुलीसोबत या लग्नाला उपस्थित होती. तर पलक सिधवाणी, नितीश भलुनी, सूनयना फौजदार, अंबिका रंजनकर, मंदार चंदावरकर म्हणजेच भिडे त्यांची पत्नी स्नेहलसोबत उपस्थित राहिले होते. मालिकेचे सर्वेसर्वा असलेल्या असित मोदी यांच्याशी मालिकेच्या काही कलाकारांचा वाद झाला होता. त्या कलाकारांना दिलीप जोशी यांनी मुलाच्या लग्नात डावललेले पाहायला मिळाले. यात जेनिफर, प्रिया आहुजा आणि शैलेश लोढा, मालव राजदा यांना दिलीप जोशी यांनी आमंत्रण देण्याचे टाळले. दिलीप जोशी यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगायचं तर त्यांनी १९८९ च्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून रामूची भूमिका साकारून बॉलिवूडच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. नंतर ते अनेक गुजराती नाटकांमध्ये दिसले, त्यापैकी एक म्हणजे सुमीत राघवन आणि अमित मिस्त्री यांच्यासोबत बापू तमे कमल करी. हे त्रिकूट त्यांच्या शुभ मंगल सावधन या टेलिव्हिजन शोसाठी ओळखले जाते. जोशी यांनी ये दुनिया है रंगीन आणि क्या बात है या शोमध्ये काम केले ज्यामध्ये त्यांनी दाक्षिणात्य बाज असलेली भूमिका केली होती.

फिर भी दिल है हिंदुस्तानी आणि हम आपके है कौन या चित्रपटांमध्येही ते झळकले होते. पण तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेने त्यांना आर्थिक दृष्टीने स्थिरस्थावर केलेले पाहायला मिळाले. ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर दिलीपची मुलगी नियती हिचे लग्न ११ डिसेंबर २०२१ रोजी प्रियकर यशोवर्धन मिश्रासोबत मुंबईतील एका तारांकित हॉटेलमध्ये झाले होते. तिच्या लग्नाला काही मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित होते. तर आज कर्जतमध्ये पार पडलेल्या ऋत्विक आणि उन्नतीच्या लग्नाला कलाकारांची मांदियाळी जमलेली पाहायला मिळाली. रित्विक जोशी हा देखील अभिनेता असून त्याने ‘धमाका’ या चित्रपटात रौनक गोयलची भूमिका साकारली होती. यासोबतच तो एक पटकथा लेखक सुद्धा आहे . द इनसाइडर्स, गुलाबी सारख्या प्रोजेक्टसाठी त्याने लेखक म्हणून काम केले आहे. तर उन्नती गाला ही गुजराती थिएटरशी संबंधित आहे. तिने अनेक गुजराती नाटकातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button