serials

ऐश्वर्या नारकर यांच्या होणाऱ्या सुनेची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री… अभिनयासोबत भरतनाट्यमचेही गिरवलेत धडे

मराठी सृष्टीतील कलाकार दांपत्य म्हणून ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांना मोठी लोकप्रियता मिळत आहे. सोशल मीडियावरील रिल्सच्या माध्यमातून हे दोघेही चाहत्यांचा संपर्कात राहत असतात. या वयातही त्यांचा हा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे, यातून जरी ते ट्रोल होत असले तरी आपलं काम करत राहायचं असे म्हणून ते पुढे जाताना पाहायला मिळतात. सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून त्या नकारात्मक भूमिका साकारत आहेत पण खऱ्या आयुष्यात सकारात्मक कसं राहायचं हे त्यांच्याकडे पाहूनच समजतं. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी मराठी इंडस्ट्रीत मोठं यश मिळवलं आहे. त्यांच्या मुलाला हा सूर अजूनही गवसलेला नाहीये. अर्थात अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर अमेय नारकर हा त्यांचा मुलगा रंगभूमीशी जोडला गेलेला आहे.

ishaa sanjay with amey narkar
ishaa sanjay with amey narkar

केवळ अभिनेता म्हणून नाही तर नाट्यसृष्टीत दिग्दर्शक म्हणूनही तो नशीब अजमावताना दिसत आहे. ‘खरा इन्स्पेक्टर मागावर आहे’ या नाटकाचे त्याने दिग्दर्शन केले आहे. अमेय नारकर हा गेली काही वर्षे ईशा संजय हिला डेट करत आहे. त्यामुळे ईशा संजय ही ऐश्वर्या नारकर यांची भावी सून म्हणून चर्चेत आली आहे. याअगोदर अमेय कॉस्टयूम डिझायनर असलेल्या त्रिशाला नायक हिच्या प्रेमात होता. पण त्रिशाला सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमेय कॉलेजचीच मैत्रीण ईशाच्या प्रेमात पडला. अमेय सोशल मीडियावर ईशावरील प्रेमाची कबुली देताना दिसला आहे. पण आता आपली हीच गर्लफ्रेंड चक्क मालिकेत झळकणार असल्याने अमेय खूपच खुश झाला आहे. ईशा संजय ही लवकरच झी मराठीवर दाखल होत असलेल्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्वेता शिंदे हिची निर्मिती असलेल्या मालिकेत नितीश चव्हाण मुख्य भूमिकेत आहे.

actress ishaa sanjay in lakhat ek amcha dada serial
actress ishaa sanjay in lakhat ek amcha dada serial

त्यात त्याच्या चार बहिणींपैकी एकीची भूमिका ईशा साकारत आहे. ईशा संजय हिने ललीतकला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. याशिवाय तिने भरतनाट्यमचेही प्रशिक्षण घेतले आहे. लाखात एक आमचा दादा या मालिकेची घोषणा करताच ईशावर सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यातच ऐश्वर्या नारकर यांनी ईशाला दिलेली प्रतिक्रियाही लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. भावी सुनेला पहिल्या वहिल्या मलिकेसाठी शुभेच्छा देताना ऐश्वर्या नारकर खुश झाल्या आहेत. दरम्यान अमेयनेही ईशासाठी पहिल्या वहिल्या मालिकेनिमित्त खास स्टोरी शेअर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button