news

का नाक खुपसायचंय प्रत्येकाच्या बाबतीत….जेव्हा रोहित जुईलीच्या लिव्हइन रिलेशनशिप बद्दल नातेवाईकांना कळतं तेंव्हा

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर हे दोघेही सारेगमप लिटिल चॅम्प्समधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. अर्थात शोच्या सेटवरच या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. पण पुढे या ओळखीचे मैत्रीत आणि प्रेमात रूपांतर झाले. आणि जानेवारी २०२२ मध्ये दोघांनी एकमेकांसोबत मोठ्या थाटात लग्न केले. दरम्यान या दोघांनी गायक म्हणून मराठी इंडस्ट्रीत यश मिळवलं होतं. जुईली आणि रोहित राऊत लग्नागोदर लिव्हइन मध्ये राहत होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल एक खुलासा केला आहे. एकमेकांना अधिक जाणून घ्यायचं असेल तर लिव्हइनचा पर्याय निवडणेच योग्य ठरेल असे रोहितचे म्हणणे होते. याबाबद्दल तो म्हणतो की, मी त्यावेळी कल्याणला राहत होतो आणि जुईली झेविअरला भेटायला जाण्यासाठी खूप वेळ जायचा.

rohit raut with wife juilee
rohit raut with wife juilee

यातील मधला दुवा म्हणून आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. अर्थात दोघांच्याही प्रेमाबद्दल घरच्यांना कल्पना होती. म्हणून मग लिव्हइन मध्ये राहण्यासाठी मी जुईलीच्या आईला कन्व्हेअन्स केलं. त्यांनी मग माझ्या बाबांना तिच्या बाबांना कन्व्हेन्स केलं. २ बीएचके घेऊ एका खोलीत ती दुसऱ्या खोलीत मी आणि दोघांच्याही आईबाबांना म्हटलं की तुम्हीही कधीही राहायला येऊ शकता. तो लॉकडाऊनचा पिरियड होता. तेव्हा आम्ही जवळपास दोन वर्षे एकमेकांसोबत राहिलो एकमेकांना समजून घेतलं. यानंतर जुईली म्हणते की, याच मधल्या काळात आम्ही सोशल मीडियावर एकत्र गातानाचा व्हिडीओ टाकला होता. तेव्हा एक निगेटिव्ह कमेंट मी वाचली की, तुम्ही एकत्र कसेकाय दोघेही वेगवेगळे व्हिडीओ बनवणारे आता एकत्र कसे गाऊ लागले. हे दोघे एकत्रच राहतात का? असे प्रश्न लोकांना पडले. पण मला कळत नाही हे आमचं आयुष्य आहे आम्हाला ते कसं जगायचं तो आमचा प्रश्न आहे, या लोकांना का नाक खुपसायचंय प्रत्येकाच्या आयुष्यात.

juilee with rohit raut
juilee with rohit raut

या व्हिडीओ नंतर तर खूप गंमत झाली. आमच्या आईवडिलांना नातेवाईकांचे फोन येऊ लागले. की हे एकत्र राहतात का?, लिव्हइनमध्ये कसे काय राहतात, तुम्हाला माहीत नाही का?…नातेवाईक फोन करून आई बाबांना हे कळवायचे पण यावर ते त्यांची फिरकी घ्यायचे. कारण आमच्या आईवडिलांना हे अगोदरच माहीत असल्याने त्यांनी नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली होती. या गोष्टीवर जुईलीचं स्पष्ट मत होतं की हे आमचं लाईफ आहे आणि आम्हाला हवं तसं ते जगू कोणाला यात नाक खुपसायची गरज नाही.तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही. आम्ही ही गोष्ट अगोदरच घरच्यांना सांगितली होती त्यामुळे कुठलीही कमेंट डिलीट करावी असा विचार आमच्या मनात आला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button