serials

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी अभिनेत्री गिरीजा प्रभु हिने घेतलं मुंबईत स्वतःच घर फोटो होत आहेत व्हायरल

अभिनेत्री प्रार्थना बेहरे, साई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, मयुरी वाघ, धनश्री काडगावकर ह्यांच्या पाठोपाठ आता सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील प्रमुख अभिनेत्री गिरीजा प्रभू हिने देखील आपल्या वयाच्या २४ व्या वर्षी मुंबईत घर घेतलं आहे. आपल्या घराचे काही फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या प्रसिद्ध मालिकेत गौरी शिर्के पाटीलची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू​ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली​. मालिकेत तिला मिळणारी वागणूक आणि यावर तिच्या सध्या सरळ व्यक्त केलेल्या भावना प्रेक्षकांना खूपच पसंतीस पडल्या. एक उत्तम डान्सर आणि मॉडेल म्हणून ती याआधीच प्रेक्षकांची मने जिंकताना पाहायला मिळाली त्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने तिला वेगळी ओळख दिली.

girija prabhu family photos
girija prabhu family photos

टीआरपीच्या बाबतीत सुख म्हणजे नक्की काय असतं हि मालिका नेहमीच टॉप १० च्या यादीत पाहायला मिळाली त्यामुळे कलाकारांना देखील चांगला मोबदला मिळाला. गिरजाने या या पूर्वी देखील लक्ष्य, विठू माऊली, जय मल्हार, क्राईम डायरी अशा मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. आपल्या कामात नेहमीच व्यस्त असणाऱ्या गिरिजाने आता स्वतःच्या हक्काचं घर घेऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. फारच कमी वयात तिने मोठं यश संपादन केलेलं पाहायला मिळतंय. सोज्वळ आणि साध्या स्वभावाच्या मालिकांमुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. अनेक लहान भूमिका साकारल्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं यामध्ये तिला पहिल्यांदाच मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिके​तील भूमिकेमुळे ती घरा​ घरात पोहोचली. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत तिने मोठा पल्ला पार केला आहे.

actress girija prabhu new home photos
actress girija prabhu new home photos

गिरीजा सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर देखील तिचे लाखो चाहते आहे. पारंपरिक वेशभूषेत म्हणजेच साडी परिधान केल्याल्या फोटोंवर चाहते लाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडताना पाहायला मिळतात. आपल्या नव्या घराची पाटी दाखवत तिने नवीन घर घेतल्याचे काही फोटो शेअर करताच अनेक कलाकारांनी देखील तीच कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button