news

त्यावेळी भीषण अपघातात अशोक सराफ याना ३ दिवसानंतर शुद्ध.. या महिलेमुळे वाचला होता जीव नाहीतर

अशोक सराफ हे मराठी सृष्टीतील एक मानाचं पान म्हटलं जातं. नुकतेच त्यांना महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यावेळी विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. आज त्यांचा आठवणीतला एक अपरिचित किस्सा इथे जाणून घेऊयात. १९८७ साली अशोक सराफ यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता त्यामुळे मी या अपघातातून सुखरूप बचवलो असं नाही तर हा माझा पुनर्जन्मच झाला आहे असे त्या या घटनेबाबत सांगतात. अशोक सराफ यांच्या मी बहुरूपी या पुस्तकात त्यांनी या घटनेबद्दल लिहिताना कल्पना कौशलचे आभार देखील मानले आहेत. कारण कल्पना कौशल हिच्यामुळेच अशोक सराफ यांचा जीव वाचला होता. हा किस्सा नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.

ashok saraf with wife nivedita
ashok saraf with wife nivedita

पुण्यातले शूटिंग आटोपून अशोक सराफ दुसऱ्या शूटिंगला जाण्यासाठी कोल्हापूरला निघाले होते. दिवसभर शूटिंगमुळे ते खूप थकले होते त्यामुळे गाडीतच त्यांना झोप लागली होती. १७ एप्रिल १९८७ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी खेड शिवापूरजवळ आली. त्यांच्या गाडीच्या समोरून एका एसटीच्या मागून आणखी एक एसटी जात होती. गाडीचा ड्रायव्हर एकच एसटी असल्याचे समजून ओव्हरटेक करायला गेला. पण समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकला त्यांची गाडी जोरात धडकली. या अपघातात अशोक सराफ यांच्या अंब्यासिडर गाडीचा चक्काचूर झाला. त्यातच गाडीच्या ड्रायव्हरचेही निधन झाले. अशोक सराफ यांना तिसऱ्या दिवशी म्हणजे २० एप्रिल रोजी शुद्ध आली तेव्हा ते आयसीयूमध्ये असल्याचे त्यांना समजले. खरं तर गाडीचा अपघात झाल्यानंतर अशोक सराफ यांना तातडीने पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र ते बेशुद्धावस्थेत होते. त्यामुळे काय घडतंय हे त्यांना अजिबातच माहीत नव्हते. ससून रुग्णालयात त्यांना दाखल केले असता उपचाराला खूप उशीर झाला.

suryakant mandhre and ajay sarpotdar
suryakant mandhre and ajay sarpotdar

अशोक सराफ यांना बघण्यासाठी तिथे खूप गर्दी जमली होती. त्यावेळी कल्पना कौशल ही महिला तिथे डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी आलेली होती. गर्दी झालेली पाहून तिने तिथे धाव घेतली तेव्हा तिने अशोक सराफ यांना ओळखले. त्यांच्याजवळ असलेल्या सगळ्या वस्तूंची तिने नोंद घेतली आणि थेट पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पुणे गेस्ट हाऊसमध्ये तिने फोन लावला. हा फोन अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी उचलला. अशोक सराफ यांचा अपघात झाला आणि त्यांना उपचार मिळत नहोयेत अशी माहिती तिने सूर्यकांत यांना दिली. तेव्हा निर्माते अजय सरपोतदार यांनी पोलिसांचे काहीही न ऐकता अशोक सराफ यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातानंतर तीन दिवसांनी अशोक सराफ शुद्धीवर आले आणि घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी त्यांच्या भावाकडून ऐकली. तीन महिने उपचारानंतर अशोक सराफ या अपघातातून ठणठणीत बरे झाले. कल्पना कौशल हिच्यामुळेच आपण सुखरुप बचवलो तिच्यामुळे मला हा पुनर्जन्म मिळाला अशी एक खास आठवण त्यांनी या पुस्तकात नमूद केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button