news

“तो परत येतोय” आता तो म्हणजे कोण? असा प्रश्न…तुझेच मी गीत गात आहे मालिका घेणार निरोप

‘तो परत येतोय…’अशी टॅगलाईन देत स्टार प्रवाह वाहिनीच्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच या मालिकेत तो परत आलाय अशी बातमी व्हायरल करण्यात आली आहे. मालिकेच्या कलाकारांनी एक व्हिडिओ शेअर करत तो परत आलाय असे म्हटले आहे. आता तो म्हणजे कोण? असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल. पण पाठमोऱ्या उभ्या असलेल्या या कलाकाराला जाणकार प्रेक्षकांनी देखील लगेचच ओळखलं आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. वैदेहीचा खून कोणी केला याचा उलगडा व्हावा म्हणून मंजुळा आणि मल्हार अतोनात प्रयत्न करत असतात. पण मोनिकाने रचलेल्या डावात सुहानी पुरती अडकलेली पाहायला मिळाली.

वैदेहीच्या मृत्यू मागे सुहानी जबाबदार आहे असा मोनिकाने बनाव रचला. सुहानीला जीवे मारून तिने या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घेतली. पण आपल्या जीवाला धोका आहे हे जाणून असलेल्या सुहानीने वैदेहीचा खून मोनिकाने केलाय याचा खुलासा करणारा एक रेकॉर्डर मल्हारच्या हार्मोनियम मध्ये लपवून ठेवलेला आहे. तो पुरावा आता पिहुला सापडणार आहे. पण मल्हार आणि मंजुळा पर्यंत हा पुरावा पोहोचेल याची शाश्वती देता येणे कठीण आहे कारण मल्हारपासून आजवर अनेक गोष्टी लपवण्यात मालिकेचे लेखक यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पुरावा त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही याची खात्री प्रेक्षकांनाही आहे. दरम्यान या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आणण्यात आला आहे. तो परत येतोय असे म्हणत या मालिकेत पुन्हा त्या कलाकाराची एन्ट्री होत आहे. हा ‘तो’ म्हणजेच शुभंकर आहे याचा खुलासा लवकरच मालिकेतून होईल. शुभंकर हा मोनिकाचा बॉयफ्रेंड आहे. पीहू ही त्याचीच मुलगी आहे हे त्याला माहित नव्हते. पण शुभंकरचा काटा काढण्यासाठी मोनिकाने त्याचा जीव घेतला असे मालिकेत दाखवले गेले.

hardik joshi enter in tujhech mi geet gaat aahe serial
hardik joshi enter in tujhech mi geet gaat aahe serial

पण त्यानंतर त्याची डेड बॉडी गायब झाली असल्याचे सांगितले. यातूनच शुभंकर जिवंत असल्याचे संकेत मिळाले होते. त्यामुळे या मालिकेत पुन्हा एकदा हार्दिक जोशीची एन्ट्री होतेय हे आता स्पष्ट झाले आहे. शुभंकरच्या येण्याने मालिकेला निर्णायक वळण मिळणार आहे. मोनिकाची कटकारस्थान हा शुभंकरच उलगडणार असा विश्वास असल्याने मालिका आता अंतिम टप्प्यावर येऊ पोहोचली आहे. लवकरच तुझेच मी गीत गात आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेच्या वेळेत तुम्हाला ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका पहायला मिळणार आहे. सुचित्रा बांदेकर यांचे निर्मिती असलेल्या मालिकेची नुकतीच घोषणा करण्यात आली . त्यात रेश्मा शिंदे प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचमुळे तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button