serials

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखलंत …. सिंधुताईच्या सासूच्या भूमिकेत झळकणार ही प्रसिद्ध अभिनेत्री

कलर्स मराठीवरील “सिंधुताई माझी माई गोष्ट चिंधीची” ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेमुळे सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना जवळून अनुभवता येत आहे. आतापर्यंत मालिकेत चिंधीचा बालपणीचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. वडिलांची सिंधुताईंना वेळोवेळी साथ मिळाली. या खडतर प्रवासातून जात असताना मुलींनी शिकायला हवं हा अभिमानचा निर्णय सरपंचांना देखील पटला आहे. आणि म्हणूनच अभिमानचे मोठे कौतुक होत आहे. आता लवकरच मालिकेत चिंधीचे लग्न होणार आहे त्यामुळे मालिकेत एका नवीन प्रवासाला सुरुवात होणार आहे .

vidya sawale with daughters
vidya sawale with daughters

चिंधीची आई आणि तिचे काका चिंधीचं लग्न लावण्याच्या तयारीला लागले आहेत.त्यामुळे मालिकेत काही नवीण पात्रांची एन्ट्री करण्यात आली आहे. चिंधीच्या सासूच्या भूमिकेत अभिनेत्री विद्या सावळे झळकताना दिसणार आहेत. लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेत विद्या सावळे यांनी खाष्ट सासुची भूमिका गाजवली होती. या मालिकेमुळे विद्या सावळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. मात्र कमी मानधनाच्या कारणास्तव विद्या सावळे यांनी मालिकेतून काढता पाय घेतला होता. त्यानंतर त्या मोजक्या मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसल्या. पण आता विद्या सावळे पुन्हा एकदा सासुच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एक नवीन भूमिका, एक नवीन आव्हान असे म्हणत त्यांनी या भूमिकेबद्दल उत्सुकता दाखवली आहे. तर त्यांच्या मुलाची हरबाची भूमिका अभिनेता अतुल आगलावे निभावताना दिसणार आहे.

sudhutai mazi maai gostha chindhichi actress
sudhutai mazi maai gostha chindhichi actress

अतुल आगलावे याने बऱ्याच चित्रपट, मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मोलकरीण बाई मालिकेतील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. अतुल पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अर्थात त्याची ही भूमिका थोडीशी विरोधी असणार हे सगळ्यांनाच माहीत आहे. कारण सिंधुताईंचा लग्नानंतरचा प्रवास प्रेक्षकांच्या परिचयाचा आहे. त्यामुळे आता चिंधीच्या वाटेत अनेक काटे आहेत. ह्या काट्यांना बाजूला सारत चिंधी तिचा मार्ग कसा काढते हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे. लवकरच मालिकेत एन्ट्री घेणाऱ्या विद्या सावळे आणि अतुल आगलावे यांना त्यांच्या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button