serials

आई कुठे काय करते मालिका अभिनेत्रीचा खुलासा…मी एंगेजमेंट केली नसून

काही दिवसांपूर्वी आई कुठे काय करते मालिका अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने एंगेजमेंट केली अशी बातमी व्हायरल झाली होती. अर्थात गौरीनेच तिच्या बोटातली अंगठी दाखवत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावरुन अनेकांना तिने साखरपुडा केला असल्याचा गैरसमज झाला. शेवटच्या त्या पोस्टमध्ये तिने इट्स हॅपनिंग असेही कॅप्शन दिले होते त्यामुळे गौरीने गुपचूप साखरपुडा केला अशी एकच चर्चा पाहायला मिळाली. तिच्या या फोटोवर सेलिब्रिटींचेही लक्ष वेधले होते त्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येऊ लागला. मात्र गौरीने या फोटोचा उलगडा केला आहे.

premas rang yave actress gauri kulkarni
premas rang yave actress gauri kulkarni

गौरीने नुकतेच एका व्यवसायात पदार्पण केले आहे. ‘नखरेल नेल्स’ हा नेल आर्ट्सचा ब्रँड तिने सुरू केला आहे. नखरेल नेल्स या तिच्या व्यवसायाची घोषणा तिने काल केली आहे. गौरीने बोटातल्या अंगठीऐवजी तिच्या रंगवलेल्या नेल आर्ट्सला फ्लॉन्ट केले होते. पण सगळ्यांचेच लक्ष तिच्या बोटातल्या अंगठिकडे गेले होते. तिने एंगेजमेंट केलेली नसून नखरेल नेल आर्ट्स हा व्यवसाय तिने सुरू केलेला आहे. आपल्या ब्रँडची जाहिरात कशी करायची हे गौरीने चांगलेच हेरले होते. बोटातल्या अंगठिमुळे गौरीने सगळ्यांचेच लक्ष बरोबर हेरून ठेवले होते. या व्यवसायाला तुमचा पाठिंबा हवा असे ती तिच्या चाहत्यांना म्हणत आहे. ‘माझ्या लास्ट पोस्टला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला खूप प्रेम दिलं त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, मी कोणामध्ये गुंतलेली नसून एका गोष्टींमध्ये गुंतलेली आहे.

gauri kulkarni nakhreil nails
gauri kulkarni nakhreil nails

गेल्या काही वर्षांपासून माझं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण होतंय. मी माझा स्वतःचा ब्रँड लॉन्च करतीये आणि या ब्रँडचं नाव आहे नखरेल नेल्स. आतापर्यंत एक अभिनेत्री म्हणून तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलंत, तसं या ब्रॅंडवरही तुम्ही तेवढंच प्रेम कराल अशी माझी अपेक्षा आहे. माझे कुटुंब, मित्र माझ्यासोबत आहेत पण तुम्हीही माझ्यासोबत असतील हा ब्रँड उभा करण्यासाठी आहि मी अपेक्षा करते.’ शेवटी गौरी असेही म्हणते की, मी जेव्हा खरंच एंगेजमेंट करेन तेव्हा तुम्हा सर्वांना नक्कीच सांगेन. दरम्यान गौरीच्या या नवीन व्यवसायानिमित्त सेलिब्रिटींनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. तिच्या या ब्रॅंडला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button