तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री… भुवनेश्वरीचा नवा डाव मास्तरीण बाईवर येणार मोठं संकट
झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत आता अधिपतीला गाण्याचे शिक्षण घ्यायचे आहे. अधिपतीला गाणं शिकता यावं म्हणून अक्षरा एका संगीत शिक्षिकेचा शोध घेते. ती शिक्षिका अधिपतीच्या घरीही येते पण भुवनेश्वरी अक्षराने निवडलेल्या शिक्षिकेला घरातून हाकलून लावते. अर्थात अक्षराचा प्रत्येक डाव भुवनेश्वरीने हाणून पाडला आहे पण यावेळी आता त्यांनी अक्षराने निवडलेल्या शिक्षिकेला नाही तर स्वतःच निवड केलेल्या शिक्षिकेला घरात आणलं आहे. पण या नवीन शिक्षिकेमुळे अधिपती आणि अक्षराच्या नात्यात दुरावा येणार का? असेच चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. मालिकेत एका शिक्षिकेची एन्ट्री होत आहे. तिला अधिपती आता मास्तरीनबाई अशीच हाक मारताना दिसत आहे.
मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या नवीन मास्तरीनबाईमुळे अक्षराच्या चेहऱ्यावर मात्र निराशा दिसून येत आहे. अर्थात अधिपती अक्षरापासून वेगळा व्हावा अशी भुवनेश्वरीची इच्छा असते त्यामुळे या नवीन मास्तरीनबाईमुळे अधिपती आपल्यापासून दूर तर नाही ना जाणार अशी शंका तिच्या मनात आली आहे. ही नवीन मास्तरीनबाई म्हणजेच सानिया चौधरी हिची या मालिकेत एन्ट्री होत आहे. सानिया आणि शिवानी रांगोळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा एकत्रित काम करत आहेत. सांग तू आहेस का? या मालिकेत या दोघींनी एकत्रित काम केले होते. त्यामुळे या दोन्ही नायिकांमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आलेले आहे. हे बॉंडिंग आता तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सुद्धा पाहायला मिळणार आहे.
दरम्यान सानिया ने झी मराठीच्याच दार उघड बये या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. पण आता तिची ही भूमिका काहीशी विरोधी स्वरूपाची असणार आहे. भिवनेश्वरीने आखलेल्या या नव्या डावात तिचा कितपत सहभाग असणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण गाणं शिकवता शिकवता ही नवीन मास्तरीनबाई अधिपतीला तिच्या जाळ्यात ओढणार तर नाही ना हा प्रश्न प्रेक्षकांनाच नाही तर अक्षराच्या देखील मनात आहे. त्यामुळे अक्षरा आता काय भूमिका घेते हे पाहण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक आहेत.