news

अभिनेत्री जुई गडकरीला जेलमध्ये टाकण्याची धमकी….धमकी देणाऱ्याचा खरपूस शब्दांत घेतला समाचार

सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलं तरी कलाकारांना ट्रोल केलं जातं हे एक ठरलेलं समीकरण आहे. अशा ट्रोलिंगला उत्तर द्यायचं किंवा नाही हे सर्वस्वी त्या कलाकारावर अवलंबून असतं. पण बऱ्याचदा गप्प राहण्यापेक्षा उत्तर दिलेलं चांगलं असं आता कलाकारांच्या बाबतीत होऊ लागलं आहे. नुकतंच अभिनेत्री जुई गडकरी हिच्या बाबतीत एक धमकी देणारा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर असलेल्या तिच्या एका चाहतीने तिला जेलमध्येच टाकण्याची धमकी दिलेली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. पुढचं पाऊल या मालिकेनंतर जुई गडकरी हिला ठरलं तर मग या मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. ही मालिका मराठी सृष्टीतील टॉपची मालिका ठरली आहे.

jui gadkari marathi actress
jui gadkari marathi actress

मालिकेतील अर्जुन आणि सायलीच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली आहे. या मालिकेमुळे जुईचा फॅनफॉलोअर्स देखील चांगला वाढला आहे. पण आता जुईच्याच एका चाहतीने तिला सोशल मीडियावरून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली आहे. जुईने तिच्या इंस्टा स्टोरीवर हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. एका महिलेने जुईला धमकी देताना म्हटले आहे की, “काय गं तुला खूप माज आलाय का?…आम्ही तुला फॉलो करायचं आणि तू आम्हाला फॉलो करत नाहीस?…आताच्या आता तू मला फॉलो करायचस , मला फॉलो नाही केलंस तर तुला जेलमध्ये टाकेन . आतापर्यंत तू आमची आवडती अभिनेत्री होतीस कारण तू मला फॉलो करशील पण तू तसं केलं नाहीस म्हणून मी तुला आता पोलिसात टाकणार आहे. उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजलं कुठेही पळायचं नाही”…आता अशा धमकीवर जुईने प्रतिक्रिया देणे साहजिकच होते.

jui gadkari tharla tar mag
jui gadkari tharla tar mag

कारण आजवर कित्येक संकटांचा सामना करणारी जुई या धमकीला घाबरणे मुळीच शक्य नव्हते. जुईने पडता काळ अनुभवला आहे मृत्यूशी तिने दोन हात केले आहेत. जगेल की नाही हा प्रश्न समोर असतानाही सकारात्मक राहून तिने मोठ्या मोठ्या आजाराला पळवून लावले आहे. त्यामुळे या अशा धमकीला काय उत्तर द्यायचं हेही जुईला ठाऊक आहे. जुईनेही या धमकीचा खरपूस समाचार घेत त्या महिलेला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ” आता झालीस तू फेमस येच तू कर्जतला बघतेच मी पण. हे अजिबात सहन केलं जाणार नाही. थेट पोलीस स्टेशनलाच भेटू मग आपण “. दरम्यान जुई गडकरी हिने या संभाषणाचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिला मिळालेली ही धमकी पाहून अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे तसेच पोलिसांची मदत घेऊन या प्रकरणावर तोडगा काढावा असेही तिला सल्ले मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button