serials

कलर्स मराठीवरून जुन्या मालिकांची उचलबांगडी… एका पेक्षा अधिक मालिकांना मिळणार डच्चू

झी मराठीचा टीआरपी खाली खेचून स्टार प्रवाह वाहिनीने गेल्या तीन वर्षात वर्चस्व गाजवलं आहे. त्यामुळे हा टीआरपी टिकवून ठेवण्यासाठी झी मराठी वाहिनीला कम्बर कसावी लागत आहे. या दोन वाहिन्यांच्या पाठोपाठ कलर्स मराठी वाहिनी देखील हा टीआरपी मिळवण्यासाठी मोठा प्रयत्न करत आहे..गेल्या काही दिवसांत कलर्स मराठी वाहिनीवर जुन्या मालिकांची उचलबांगडी झालेली पाहायला मिळत आहे..त्यात आता धडाधड एकापाठोपाठ एक अशा नवीन मालिकांची यादीच समोर आणून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्याचा सपाटा लावला आहे.

antarpat new marathi serial
antarpat new marathi serial

भाग्य दिले तू मला या मालिकेच्या एक्झिट नंतर कलर्स मराठी वाहिनी आणखी तीन नव्या मालिका आणत आहे. ‘अबीर गुलाल’ आणि ‘अंतरपाट’ या दोन नव्या मालिकेचे प्रोमो नुकतेच प्रेक्षकांसमोर आले आहेत. अबीर गुलाल या मालिकेत सावळ्या आणि गोऱ्या वर्णाचा भेद पाहायला मिळणार आहे. तर अंतरपाट ही मालिका कौटुंबिक कथेवर आधारित असलेली एक प्रेमकथा आहे. अबीर गुलाल या मालिकेत गायत्री दातार आणि पायल जाधव या दोन नायिका तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर अंतरपाट मध्ये रश्मी अनपट आणि अशोक ढगे ही फ्रेश जोडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यासोबत कलर्स मराठी वाहिनी आणखी एक मालिका लवकरच प्रेक्षकांसमोर आणत आहे. या नवीन मालिकेचे नाव जाहीर करणे तूर्तास वाहिनीने टाळले आहे.

abir gulal new marathi serial
abir gulal new marathi serial

पण हे लवकरच म्हणजे ‘बिग बॉस मराठी ‘ सिजन ५ तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. हसताय ना हसायलाच पाहिजे, सुख कळले, इंद्रायणी या मालिकेनंतर आता अबीर गुलाल, अंतरपाट या नवीन मालिका प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहेत. पण कलर्स मराठीने त्यांचा बिग बॉस मराठी हा हिट शो देखील लवकरच आणावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान अबीर गुलाल ही मालिका कन्नड मालिका लक्षणा हिचा रिमेक आहे तर अंतरपाट ही मालिका देखील अंतरपाटा या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. तेव्हा या नव्या मालिकांच्या येण्याने कलर्स मराठी वाहिनी टीआरपीच्या स्पर्धेत आपले स्थान पुन्हा मिळवणार का हे पाहावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button