पारू मालिकेतील अभिनेत्रीचा काही दिवसांपूर्वी गुपचूप झाला साखरपुडा… होणारा पती आहे प्रसिद्ध व्यक्ती
झी मराठीवरील पारू या मालिकेत लवकरच आदित्य पारूला त्याच्या प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. देवीआई चं व्रत पूर्ण व्हावं म्हणून पारूने स्वतःच्या तोंडाने विष काढलं होतं. त्यामुळे पारुच्या जीवाला धोका असल्याचे दाखवण्यात आले होते पण आता पारुवरचं संकट टळलं असून ती आता शुद्धीत आली आहे आणि पुन्हा आपल्या घरी परतली आहे. पण यामुळे आता आदित्यला पारूवर असलेल्या प्रेमाची जाणीव होत आहे. हळूहळू तो आता तिच्या प्रेमात पडला असून लवकरच तो पारूला तिच्यावरील प्रेमाची कबुली देऊ शकतो. पारू ही मालिका अल्पवधितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेचे शूटिंग साताऱ्यात केली जात आहे. मालिकेचे आकर्षक शूटिंग लोकेशन देखील प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
पारू ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टॉप १५ च्या घरात स्थान पटकवताना दिसली आहे. त्यामुळे मालिकेची नायिका पारू म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनवणे हिचा अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला आहे. शरयू सोनवणे ही एक गुणी अभिनेत्री आहे. आटली बाटली फुटली, सूर सपाटा, अलिप्त या चित्रपटातून तिने काम केले होते. महेश कोठारे यांनी शरयुला पहिल्यांदा नायिकेची संधी मिळवून दिली ती प्रेम पॉइजन पंगा या मालिकेतून. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पिंकीचा विजय असो या मालिकेत प्रमुख भूमिका देऊ केली. पण मालिका सुरळीत सुरू असतानाच शरयुने मालिकेतून काढता पाय घेतला. त्यादरम्यान तिने फिल्ममेकर असलेल्या जयंत लाडे याच्याशी गुपचूप साखरपुडा केला. लग्नामुळे शरयुने मालिकेतून काढता पाय घेतला असे त्यावेळी बोलले जाऊ लागले पण त्यानंतर ती झी मराठीच्या पारू या मालिकेत झळकणार असे समोर आले.
त्यामुळे एका मोठ्या प्रोजेक्टसाठी शरयुने पिंकीचा विजय असो या चालू मालिकेतून काढता पाय घेतला होता. पण आता पारुच्या भूमिकेने शरयू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसत आहे. पारुच्या आयुष्यातल्या रिअल लाईफ आदित्यचा तिला या मलिकेसाठी फुल सपोर्ट आहे. त्यामुळे मालिकेनंतर ते दोघेही लवकरच विवाहबद्ध होतील असे म्हटले जात आहे. तूर्तास पारू प्रेक्षकांची पसंती मिळवू लागली असल्याने ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत लवकरच पुढे येईल असे बोलले जात आहे. कारण १८ व्या स्थानावरून ही मालिका आता १५ व्या स्थानावर येऊन पोहोचली आहे.