ठरलं तर मग ही मालिका आता गेल्या काही दिवसांपासून रंजक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. सायली आणि अर्जुन या दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे याचे दाखले दोघांनाही मिळालेले आहेत मात्र आता ते प्रेमाची जाहीर कबुली कधी देतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान मालिकेत साक्षी आणि चैतन्य चा साखरपुडा होणार आहे. या साखरपुड्याच्या सोहळ्यात रंजक ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. साक्षी गुन्हेगार आहे आणि ती चैतन्यला फसवुन त्याच्याकडून सगळे खुलासे काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेमाचे नाटक करता करता साक्षी आता चैतन्य सोबत साखरपुडा करण्याच्या तयारीत आहे. मात्र दुसरीकडे अर्जुन चैतन्यला या सावजातून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. साक्षी तुला फसवतीये आणि तिनेच कुणालचा खून केलाय याचा उलगडा तो चैतन्यजवळ करताना दिसणार आहे.
पण साक्षीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या चैतन्यला अर्जुनच्या बोलण्यावर विश्वास बसेल का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. पण आता लवकरच चैतन्यचे डोळे उघडतील आणि साक्षीचं खरं रूप त्याला समजेल असा ट्विस्ट मालिकेच्या गुरुवारच्या होणाऱ्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. २ मे रोजी ठरलं तर मग या मालिकेचा विशेष भाग प्रसारित होत आहे. त्यात अर्जुन आणि सायली चैतन्यची भेट घेताना दिसत आहेत. कुणालचा खून साक्षीने केलाय आणि ती तुला फसवतीये हे समजल्यावर चैतन्य आता साखरपुड्याच्या सोहळ्यात गोंधळ घालताना दिसणार आहे. आता ह्या ट्विस्टमध्ये प्रेक्षकांना अपेक्षित असेच काहितरी घडेल अशी अपेक्षा आहे. मात्र सायली आणि अर्जुनच्या लग्नाचं सत्य चैतन्यने साक्षीला सांगितलेलं आहे त्यामुळे अर्जुन आणि सायलीचा डाव यशस्वी होणार की मालिकेत साक्षीच काहीतरी नवा डाव आखणार हे तुम्हाला गुरुवारच्या भागात पाहायला मिळणार आहे.
अर्जुन आणि सायलीच्या खोट्या लग्नाची गोष्ट साक्षीला माहीत झालेली आहे त्यामुळे प्रियाला सोबत घेऊन ती आणखी काही नवीन डाव रचणार का हे पाहणे रंजक होणार आहे. कारण एवढ्यात तरी चैतन्य अर्जुनच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल असे चित्र दिसत नाहीये. साक्षीच्या प्रेमात बुडालेल्या चैतन्यला आता अर्जुनचं बोलणं खोटं वाटत आहे.. त्यामुळे कुणालचा खुनाचे पुरावे दिल्यावर चैतन्य त्यावर विश्वास ठेवेल की नाही यावर प्रेक्षकांनाच संभ्रम आहे. म्हणूनच हा ट्विस्ट नेमका काय असणार आहे ते पाहण्यासाठी प्रेक्षकांना गुरुवारच्या एपिसोडची वाट पाहावी लागणार आहे. अर्जुनच्या बोलण्यावर चैतन्यने विश्वास ठेवावा आणि त्याने साक्षीसोबतचा साखरपुडा रद्द करावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.