ठरलं तर मग या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून गूढ कथानकाचे अनेक धागेदोरे उलगडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही मालिका अधिकच रंजक होत चालली आहे. अशातच नागराज एका मार्केट मध्ये प्रतिमाला बघतो तो सगळीकडे तिचा शोध घेत असतो. पण सुदैवाने प्रतिमा तिथून पळ काढण्यात यशस्वी ठरते. नागराज आणि प्रिया दोघेही महिपतकडे जातात तेव्हा नागराज ‘मी प्रतिमाला पाहिलं’ असा एक खुलासा करतो. मालिकेचा हा ट्विस्ट तुम्हाला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. या ट्विस्टमध्ये प्रतिमाला कोणी मारण्याचा प्रयत्न केला याचा उलगडा होणार आहे. महिपतच किल्लेदार कुटुंबाला संपवण्याचा घाट घालत असतो. तो स्वतःच आपल्या या कृत्याची कबुली नागराजला देत असतो. प्रतिमाच्या हत्येचा कट आज मालिकेतून उलगडताना पाहायला मिळणार आहे.
प्रतिमाच्या चेहऱ्यावर असलेल्या जाळालेल्याच्या खुणा कशा येतात याचाही उलगडा आजच्या भागात होणार आहे. प्रतिमाला समोर पाहिल्यानंतर प्रिया आणि नागराज महिपतला भेटायला जातात. तेव्हा नागराज कासावीस झालेला असतो. पण त्याची ही तळमळ पाहून महिपत त्याला या घटने मागचे सत्य सांगतो. मीच प्रतिमाची हत्या केलीये त्यामुळे प्रतिमा तुला दिसणे शक्यच नाही असे म्हणत महिपत भूतकाळात जातो. किल्लेदार कुटुंबाचा अपघात होतो त्यावेळी त्यांच्या गाडीला आग लागते मी पोलिसांना पाहून लपून बसतो. पण नंतर पोलीस गेल्यावर किल्लेदार कुठंच सापडत नाहीत पण तिथेच बाजूला प्रतिमा मात्र दुखापत झाल्याने रडत पडलेली असते. तेव्हा मीच प्रतिमाला जाळून तिची हत्या करतो. त्यामुळे प्रतिमा जिवंत आहे आणि ती तुला दिसतेय हे सगळं खोटं आहे असा विश्वास महिपत नागराजला देत असतो.
मालिकेतील काही गूढ घटना आता हळूहळू उलगडताना पाहायला मिळणार आहेत. महिपतच प्रतिमाला जाळण्याचे काम करतो, पण प्रतिमा या घटनेतून सुखरूप बाहेर पडल्याचे फक्त तिच्या चेहऱ्यावर जळलेल्याच्या खुणा राहतात. त्या घटनेत प्रतिमाचा मृत्यू झाला असा समज महिपत करून घेत असतो त्यामुळे नागराजलाही तो प्रतिमा जिवंत नसल्याचे सांगतो. आता या मालिकेचे गूढ लवकरात लवकर उलगडावे आणि सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य सगळ्यांसमोर यावे अशी प्रेक्षकांची इच्छा आहे.