marathi tadka

त्या फोटोमुळे अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा ट्रोल… सईच्या फोटोंवर पहा नेटकरी काय म्हणतात

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या नव्या आलिशान घरात प्रवेश केला. ‘द इलेव्हनथ प्लेस’ असे म्हणत सईने तिच्या या नवीन घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. आतापर्यंत सईने दहा घरं बदलली आहेत पण हे अकरावं घर तिच्या हक्काचं झालं आहे. सई लहान होती तेव्हा ती सांगलीतील आईबाबांच्या घरात राहत होती. पुढे ती मुंबईला येऊन मावशीकडे राहायला लागली. काही दिवस तिने पेइंग गेस्ट म्हणूनही काढले होते. त्यानंतर ती आता जिथे राहते त्या बिल्डिंगच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये ती एका फ्लॅटमध्ये राहत होती. पण आता आपलंही घर असावं या हेतूने सईने मुंबईत स्वतःच्या हक्काचा फ्लॅट खरेदी केला. पण आता तिची चर्चा होतेय ते तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे.

sai tamhankar photos
sai tamhankar photos

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या बोल्ड फोटो आणि चित्रपटातील हॉट सीनमुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळते. नुकतंच अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपले काही बोल्ड फोटो आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर शेअर केले. अनेकांनी तिच्या फोटोंवर चांगल्या कमेंट केलेल्या पाहायला मिळाल्या तर काहींना हे मुळीच पटलेले नाहीये तिचे ते पाहून नेटकरी चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. अनेकांनी तिला खडेबोल देखील सुनावले आहेत. नेटकरी म्हणतात “अरे बाबा… तूम्ही एक बाई आहात आणि त्यात तूम्ही मराठी घराण्यात जन्माला आला आहात… शोभत का तुम्हाला असं विवश्र फोटो अपलोड करायला आणि काढायला” “Maharashtra chi sanskriti बघा कोणत्या lavel ला नेलं मॅडम न ” “आजच्या स्टोरी मधे पहिलाच फोटो तुम्ही सावित्रीबाई यांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन फोटो तुमच्या स्टोरी ला लावला आणि थोड्याच वेळात तुम्ही असले फोटो टाकता????” अश्या अनेक कमेंट आलेल्या पाहायला मिळत आहेत.

sai tamhankar marathi actress
sai tamhankar marathi actress

पण आता चित्रपटांत आणि मालिकेत कामे मिळवायची म्हणून अनेक अभिनेत्री आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर सर्रासपणे टाकताना पाहायला मिळतात जेणेकरून त्या कायम चर्चेत राहतात आणि त्यामुळेच त्यांची मालिकेत किंवा चित्रपटांत वर्णी लागते. अनेक चित्रपट काम मिळण्यासाठी तुमचं सोशल मीडिया अकाउंट किती ऍक्टिव्ह आहे त्यावर किती फिल्लोवेर्स आहेत हे सगळं पाहिलं जात. पटत नसलं तरी हीच वस्तुस्तिथी आहे जो दिखता हे वही बिकता हे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button