serials

झी मराठी वाहिनीची आणखीन एक मालिका गाशा गुंडाळतेय… शुटिंगचे काही दिवस राहिले म्हणत अभिनेत्रीने

झी मराठी वाहिनीवरील बऱ्याचशा मालिकेने आपला गाशा गुंडाळण्याची तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच नवा गडी नवं राज्य आणि ३६ गुणी जोडी या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या जोडीलाच आता आणखी एका मालिकेच्या निरोपाची वेळ जवळ येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे. तू चाल पुढं ही झी मराठीची मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अश्विनीसारख्या सामान्य गृहिणीची कथा मालिकेतून दाखवल्याने प्रेक्षकांनी या मालिकेला चांगला प्रतिसाद दिला होता. अश्विनी आणि तिच्या कुटुंबावर वेगवेगळी संकटं ओढावली पण त्यातून तिने सर्वांना सुखरूप बाहेर काढलेले पहायला मिळाले. आता या मालिकेत मीरा कौशिकची एन्ट्री झालेली आहे. ही मीरा श्रेयसच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसून येते. श्रेयसला मिळवण्यासाठी मीरा कुठल्याही थराला जाऊ शकते हे तिने तिच्या कृतीतून दाखवून दिले आहे.

tu chal pudh actress dhanashri kadgaonkar
tu chal pudh actress dhanashri kadgaonkar

महत्वाचं म्हणजे यात तिला शिल्पीची देखील साथ मिळत आहे. पण मीराच्या कटकारस्थानातून अश्विनी श्रेयसला बाहेर नक्कीच काढेल असा प्रेक्षकांना विश्वास आहे. दरम्यान अश्विनी श्रेयसची लेक मयुरी आणि प्रतीकच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिका आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. लग्नाच्या या गोड शेवटाने मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल असे चित्र सध्या तरी दिसत आहे. झी वाहिनीच्या सर्वच मालिका सुरवातीला खूप चांगल्या वाटतात प्रेक्षक त्या मालिकांना डोक्यावर देखील घेतात पण जसजशी मालिका पुढे जाते ती कंटाळवाणी व्हायला लागते असं अनेक प्रेक्षकांत मत आहे.

dhanashri kadgaonkar tu chal pudh
dhanashri kadgaonkar tu chal pudh

नुकतेच अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने मालिकेचा निरोप घेण्याची वेळ आली आहे असे म्हणत सेटवरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. “तू चाल पुढंच्या शुटिंगचे शेवटचे काही दिवस” असे म्हणत धनश्रीने सेटवर निवांतक्षणी बसलेला एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मालिकेचा शेवट गोड दाखवून ती योग्य वेळी संपवावी अशी प्रेक्षकांची देखील अपेक्षा असते. या निर्णयाचे प्रेक्षकांनी देखील स्वागतच केले आहे. येत्या काही दिवसात झी मराठी वाहिनीवर शिवा , पारू , ड्रामा ज्युनिअर्स असे तीन नवीन शो दाखल होत आहेत. त्यामुळे वाहिनीने बऱ्याचशा जुन्या मालिकांचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button