सिद्धार्थ तीतीक्षाच्या हळदीला कलाकारांची हजेरी…लग्नाचा थाट आहे खूपच खास व्हिडिओ होतोय व्हायरल
![marathi actress wedding news](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/02/7746543235436475.jpg)
सिद्धार्थ बोडके आणि तीतीक्षा तावडे यांनी काल २५ फेब्रुवारी रोजी साखरपुडा करून चाहत्यांना लगीनघाई सुरू झाल्याची बातमी दिली. अभिनेत्री अनघा अतुल हिने सिध्दार्थची करवली म्हणून जबाबदारी सांभाळलेली पाहायला मिळाली. सिद्धेश आणि तीतीक्षाचे लग्न अटेंड करता यावे म्हणून दोन दिवसांपूर्वी वऱ्हाडी मंडळी ठाण्यात दाखल झाली आहेत. साखरपुड्यानंतर काल सिद्धार्थ तीतीक्षाच्या मेंदीचा सोहळा पार पडला. तर आज सकाळीच या दोघांची हळद पार पडली. रसिका सुनील, गौरी नलावडे, ऋतुजा बागवे, अनघा अतुल यासारख्या सेलिब्रिटींनी सिद्धार्थ तीतीक्षाच्या हळदीला हजेरी लावली होती. बहीण खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांनी देखील या सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेतलेले पाहायला मिळाले. या लग्नाचा थाट खास असणार आहे कारण हे दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिवानी सुर्वे हिनेही ठाण्यातच डेस्टिनेशन वेडिंग केले होते. सिद्धार्थ बोडके आणि तीतीक्षा तावडे हे गेली पाच वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. तू आहि जवळी राहा या झी युवा वरील मालिकेतून दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. सिद्धार्थ बोडके याने मराठी सह हिंदी चित्रपट सृष्टीतही स्थान मिळवले आहे. तर तीतीक्षाने बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली आणि प्रमुख नायिका म्हणून स्थिरस्थावर झाली. झी मराठीच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत तिने नेत्राची भूमिका साकारून प्रेक्षकांची पसंती मिळवली. तर बहीण खुशबू देखील झी मराठी वर महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. तीतीक्षा आणि सिद्धार्थ हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत हे अगोदरच त्यांनी जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे केळवण साजरे करण्यात आले तेव्हा हे दोघे लवकरच लग्न करणार असे जाहीर झाले होते.
![titeekshaa tawde and siddharth bodke wedding engagement](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/02/43567564343655475.jpg)
या दोघांच्या जोडीला मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांच्याही लग्नाचा बार उडणार आहे. नुकताच या दोघांचा मुंबईत संगीतसोहळा पार पडला. खाजगीत पार पडणाऱ्या या लग्नाला भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, अभिजित खांडकेकर, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहरे, गौरी महाजनी हे कलाकार हजेरी लावत आहेत. आजच पूजा आणि सिद्धेशची हळद पार पडणार आहे. एकाच दिवशी या दोन सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू झाल्याने मराठी सृष्टीत एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.