news

थाटात पार पडलं तीतीक्षा सिध्दार्थचं लग्न.. ऐश्वर्या नारकर सह कलाकारांची जमली मांदियाळी

अभिनेत्री तीतीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके आज सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी डेस्टिनेशन वेडिंगसाठी ठाण्याची निवड केली. काल मेंदी, आज सकाळी हळद आणि काही वेळापूर्वीच लग्न असा त्यांचा लग्नाचा सुरळीत विधी पार पडला. तीतीक्षा आणि सिध्दार्थने त्यांच्या लग्नात ऑफ व्हाइट रंगाच्या थीमला पसंती दर्शवली. नऊवारी साडी त्यावर पिवळ्या रंगाचा डीझायनर ब्लाउज अशा आकर्षक पेहरावात तीतीक्षा नववधू म्हणून लक्ष वेधून घेताना दिसली. या लग्नाला ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर, एकता डांगर, रसिका सुनील, अनघा अतुल, ऋतुजा बागवे ह्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. सिद्धार्थ बोडके आणि तीतीक्षा तावडे यांनी काल २५ फेब्रुवारी रोजी साखरपुडा करून चाहत्यांना लगीनघाई सुरू झाल्याची बातमी दिली होती.

siddharth and teetiksha wedding photos
siddharth and teetiksha wedding photos

यावेळी अभिनेत्री अनघा अतुल हिने सिध्दार्थची करवली म्हणून जबाबदारी सांभाळलेली पाहायला मिळाली. सिद्धेश आणि तीतीक्षाचे लग्न अटेंड करता यावे म्हणून दोन दिवसांपूर्वी वऱ्हाडी मंडळी ठाण्यात दाखल झाली होती. साखरपुड्यानंतर काल सिद्धार्थ तीतीक्षाच्या मेंदीचा सोहळा पार पडला. तर आज सकाळीच या दोघांची हळद पार पडली. रसिका सुनील, गौरी नलावडे, ऋतुजा बागवे, अनघा अतुल यासारख्या सेलिब्रिटींनी सिद्धार्थ तीतीक्षाच्या हळदीला हजेरी लावली होती. बहीण खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांनी देखील या सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेतलेले पाहायला मिळाले. डेस्टिनेशन वेडिंग असल्याने या लग्नाचा थाट मोठा असणार हे अगोदरच जाहीर झाले होते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिवानी सुर्वे हिनेही ठाण्यातच डेस्टिनेशन वेडिंग केले होते. सिद्धार्थ बोडके आणि तीतीक्षा तावडे हे गेली पाच वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. तू आहि जवळी राहा या झी युवा वरील मालिकेतून दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. सिद्धार्थ बोडके याने मराठी सह हिंदी चित्रपट सृष्टीतही स्थान मिळवले आहे.

तर तीतीक्षाने बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली आणि प्रमुख नायिका म्हणून स्थिरस्थावर झाली. झी मराठीच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत तिने नेत्राची भूमिका साकारून प्रेक्षकांची पसंती मिळवली. तर बहीण खुशबू देखील झी मराठी वर महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. तीतीक्षा आणि सिद्धार्थ हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत हे अगोदरच त्यांनी जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे केळवण साजरे करण्यात आले तेव्हा हे दोघे लवकरच लग्न करणार असे जाहीर झाले होते. या दोघांच्या जोडीला मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांच्याही लग्नाचा बार उडणार आहे. नुकताच या दोघांचा मुंबईत संगीतसोहळा पार पडला. खाजगीत पार पडणाऱ्या या लग्नाला भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, अभिजित खांडकेकर, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहरे, गौरी महाजनी हे कलाकार हजेरी लावत आहेत. आजच पूजा आणि सिद्धेशची हळद पार पडणार आहे. एकाच दिवशी या दोन सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू झाल्याने मराठी सृष्टीत एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button