
तुझ्यात जीव रंगला या झी मराठीच्या मालिकेने आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून ठेवले आहे. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांना परिचयाची आहेत. या मालिकेतील बालकलाकार आता नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकेत राणाचा भाऊ म्हणजेच बालपणीच्या सुरजची भूमिका सिद्धेश खुपेरकर याने साकारली होती. सिद्धेशने या मालिकेनंतर काही मोजक्या प्रोजेक्ट मध्येही काम केले होते. पण आता त्याची मुख्य भूमिका असलेला “सहल” हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सिद्धेश खुपेरकर आणि कल्याणी अडसूळ दोघेही मुख्य भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री देविका दफ्तरदार यात सिद्धेशच्या आईची भूमिका साकारत आहेत. एक १४ वर्षाचा मुलगा मैत्रिणीने सांगितलं म्हणून सहलीला जाण्याची तयारी करतो, पण आर्थिक परिस्थितीमुळे तो हतबल होतो.

हे देखील पहा –
‘तुझ्यात जीव रंगलामधील’ छोटा सुरज आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा…
डॉ. केशव हेडगेवार यांची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराला ओळखलंत वडील देखील आहेत प्रसिद्ध कलाकार
नाळ २ चित्रपट आणि कलाकार देविका दफ्तादार एका नव्या भूमिकेत
अशा परीस्थित तो कुठेतरी काम मिळवून पैसे कमावण्याचा विचार करतो. पण वय कमी असल्याने त्याला कोणी काम देत नसते. शेवटी आजीने वारीला जाण्यासाठी साठवून ठेवलेले पैसे तो चोरतो. पण आपण वाईट काम करतोय याची त्याला जाणीव होते आणि चोरलेले पैसे तो पुन्हा नेऊन ठेवतो. आता हा चिमुरडा सहलीला कसा जाणार? याची ही रंजक कहाणी ‘सहल’ चित्रपटातून तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रशांत केसरकर यांची असून सिद्धेशचे वडील मुकुंद खुपेरकर हे लेखक,दिग्दर्शक , सहनिर्माते अशा भूमिकेत दिसणार आहेत. मुकुंद खुपेरकर हे कोल्हापूरचे, शॉर्टफिल्म साकारत असताना त्यांनी आता सहल चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. चित्रपटात बहुतांशी कलाकर हे नव्याने कॅमेरा फेस करत आहेत त्यामुळे अनेक नवख्या चेहऱ्यांना अभिनयाची संधी मिळाली आहे.

चित्रपटाला संगीत जयभीम शिंदे यांनी दिले असून गीतकार सुहास मुंडे तसेच समिर पठाण यांचे असणार आहे . आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजात चित्रपटाचं गाणं रेकॉर्ड केलं आहे. तेव्हा मुकुंद खुपेरकर यांच्या आयुष्याची सहल मुलगा सिद्धेशच्या माध्यमातून ते मोठया पडद्यावर उतरवत आहेत. एका सामान्य कुटुंबातील प्रत्येकाच्या आयुष्यातली ही सहल प्रेक्षकांना बघायलाही नक्कीच आवडेल यात शंका नाही. या चित्रपटानिमित्त सर्वच कलाकार टीमला मनःपूर्वक शुभेच्छा!.