लोकप्रिय अभिनेत्याचं ट्रांसफॉर्मेशन पाहून मराठी सेलिब्रिटीही अवाक…बायको आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री
अभिनय क्षेत्रात काम करायचं म्हटलं की तुम्हाला फिट दिसायला हवं हा एक सर्वसामान्य समज आहे. पण जाडजूड असूनही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणाऱ्या राम कपूरला तुम्ही आता ओळखू शकणार नाही. राम कपूर हे हिंदी मालिका सृष्टीतील एक नावाजलेलं नाव आहे. घर एक मंदिर, बडे अच्छे लगते है, कसम से अशा मालिकेतून राम कपूर यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. आजही ते हिंदी मालिका सृष्टीत कार्यरत आहेत मात्र गेल्या दोन वर्षात त्यांनी स्वतःच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित केलेले पाहायला मिळाले.
राम कपूर हे गोलूमोलू दिसत असले तरी त्यांच्या अभिनयावर प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आहे. पण आता त्याचं हे ट्रान्सफॉरमेशन पाहून सेलिब्रिटीही अवाक झाले आहेत. राम कपूर यांनी नुकताच एक फोटो शेअर केला आहे त्यात त्यांचा आताचा लूक पाहून हे तेच आहेत का? असा प्रश्न पाहणाऱ्याला पडला आहे. घर एक मंदिर मालिकेत काम करत असताना अभिनेत्री गौतमी गाडगीळ सोबत त्यांचे प्रेमाचे सूर जुळून आले. गौतमी गाडगीळ हिने १९९९ सालच्या बिनधास्त चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती.
हा चित्रपट गाजल्यानंतर तिला हिंदी मालिकेची ऑफर मिळाली. यातूनच राम कपूर सोबत तिचे प्रेम जुळले आणि २००३ मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नानंतर गौतमीने हिंदी सृष्टीतच काम केलेले पाहायला मिळाले. फिट दिसण्यासाठी हे दोघेही मोठी मेहनत घेताना दिसतात. पण राम कपूर यांचे हे ट्रान्सफॉर्मेशन आश्चर्यकारक ठरले आहे.