
झी मराठी वाहिनीवर आता देवमाणूस या मालिकेचा मधला अध्याय प्रसारित होत आहे. श्वेता शिंदे ही या मालिकेची निर्माती असून पुन्हा एकदा डॉ अजितकुमार देव ची भूमिका किरण गायकवाड साकारणार आहे. या मालिकेच्या एंट्रीमुळे झी मराठीच्या एका मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे. दरम्यान चल भावा सिटीत या रिऍलिटी शो मुळे झी मराठीच्या मालिकेच्या प्रसारण वेळेत अगोदरच बदल करण्यात आले होते. पण आता अशाच एका मालिकेला टीआरपी मिळत नसल्याच्या कारणास्तव प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे.

झी मराठीच्या बहुतेक मालिकेत रंजक घडामोडी सुरू आहेत पण प्रेक्षकच कमी प्रतिसाद देत असल्याने वाहिनीला हा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे ही निरोप घेत असलेली मालिका आहे ‘ नवरी मिळे हिटलरला’. अभिराम आणि लीला दोघेही एकत्र येऊ नयेत यासाठी त्यांच्या घरच्यांनी अनेक प्रयत्न केले. अशातच अभिरामच्या पहिल्या पत्नीची देखील यात एन्ट्री करण्यात आली. पण हा ट्विस्ट प्रेक्षकांना मुळीच रुचला नाही. त्यामुळे या मालिकेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळणे कठीण झाले. वल्लरी विराज आणि राकेश बापट यांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने या मालिकेला सजग करण्याचा प्रयत्न केला होता.

पण मालिका पुढे सरकतच नसल्याने प्रेक्षकही पुरेसा प्रतिसाद देत नव्हते. याचमुळे आता या मालिकेला निरोप देण्याची वेळ आली आहे. देवमाणूस ही मालिका कधी सुरू होणार हे अजून जाहीर केलेले नाही. मात्र पुढच्या महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते असे अंदाज वर्तवले जात आहे. त्यामुळे या वेळेत नवरी मिळे हिटलरला मालिका निर्णायक बदल घडवून आणू शकते.