खळबळजनक! भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाचा चुकीचा वापर….दादासाहेब फाळकेंच्या नातवाने केली खंत व्यक्त

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून स्वतःची प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभीनेत्यावर फाळके यांच्या नातवाने गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात. अभिनेता , निर्माता ‘अमित फाळके’ यांची मराठी सृष्टीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे प्रेक्षकांना ते चांगले परिचयाचे झाले आहेत. पण नुकत्याच प्रकाशित झालेल्या मार्मिकच्या अंकात अमित फाळके यांचा एक लेख वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे. ” प्रेमळ हेडमास्तर श्यामबाबू!” या अमित फाळके यांच्या लेखात त्यांनी श्याम बेनेगल यांच्या सहजीवनाचा प्रवास उलगडला आहे. पण या लेखात त्यांनी ‘मी आणि आमचे दादासाहेब फाळके(म्हणजे माझे वडील हो)…’ असा उल्लेख केला आहे.

अमित फाळके स्वतःला दादासाहेब फाळके यांचा मुलगा म्हणवतात ही गोष्ट स्वतः दादासाहेब फाळके यांचा नातू “चंद्रशेखर पुसाळकर” यांना खटकली आहे. दादासाहेब फाळके यांना एकूण ७ मुलं आणि २ मुली होत पण यापैकी आज कोणीही हयातीत नाहीत. दादासाहेब फाळके यांची मुलगी मालती फाळके लग्नानंतर त्या वृंदा पुसाळकर नावाने ओळखल्या जात. त्यांचाच मुलगा चंद्रशेखर पुसाळकर यांनी अमित फाळकेवर हा घणाघाती आरोप लावला आहे. अमित फाळके स्वतःला दादासाहेबांचा मुलगा कसा संबोधु शकतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. “दादासाहेबांच्या मुलांमध्ये आता कोणीही हयातीत नाहीत. त्यांची कनिष्ठ कन्या म्हणजे माझी आई जी एकमेव त्यांची मुलगी वृंदा हयातीत होती पण तीचे २००६ मध्ये निधन झाले. दादासाहेब फाळके यांचे १९४४ मध्ये निधन झाले मग अमित फाळके स्वतःला दादासाहेबांचा मुलगा म्हणून कसा संबोधू शकतो? दादासाहेबांच्या नावाचा वापर करून अशी खोटी प्रसिद्धी कशी काय मिळवली जाते. मी त्यांचा नातू आहे, यामुळे आम्हाला वैयक्तिक त्रास होत आहे.” असे म्हणत चंद्रशेखर पुसाळकर यांनी अमित फाळके यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. अमित फाळके यांचे वडील दादासाहेब फाळके नेमके कोण ? ह्याचा उलगडा त्यांनी करावा असं त्यांचं मत आहे.

चंद्रशेखर पुसाळकर हे गेली अनेक वर्षे आजोबा दादासाहेब फाळके यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा म्हणून केंद्रशासनाकडे मागणी करत आहेत. दादासाहेब फाळके यांना भारतरत्न मिळावा म्हणून त्यांची मुलगी वृंदा पुसाळकर आणि इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी मिळून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मदतीने केंद्राकडे मागणी केली होती. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान होते तर सुषमा स्वराज या सांस्कृतिक मंत्री होत्या. पण त्यांनीही आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. किमान आतातरी दादासाहेब फाळके यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा अशी आर्त मागणी चंद्रशेखर पुसाळकर यांनी केली आहे. “आज आम्हाला हे मागावं लागतंय याचंच जास्त दुःख आहे” असे म्हणत त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे.