स्टार प्रवाहाची आणखीन एक मालिका होतेय बंद? ह्या सुंदर अभिनेत्रीची नवीन मालिकेत करतेय पदार्पण
येत्या २७ मे पासून स्टार प्रवाह वाहिनीवर ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवीन मालिका प्रसारित होत आहे. गेल्या काही दिवसांत या वाहिनीवर दोन नव्या मालिकांची एन्ट्री झाली आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत ६ व्या क्रमांकावर प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. तर साधी माणसं ही मालिका ८ व्या क्रमांकावर आहे. या दोन मालिकेच्या जोडीला स्टार प्रवाह वाहिनीवर तिसरी नवीन मालिका दाखल होणार हे अगोदरच जाहीर करण्यात आले होते. स्टार प्रवाहच्या अवॉर्ड सोहळ्यात अभिनेता विशाल निकम आणि पूजा बिरारी यांनी एकत्र हजेरी लावली होती तेव्हाच प्रेक्षकांना या नव्या मालिकेची चाहूल लागली होती.
त्यानंतर मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला ज्यात नीना कुळकर्णी, अतिषा नाईक यांनाही सहाय्यक आणि विरोधी भूमिकेत पाहता आले. दरम्यान ही मालिका आता २७ मे पासून रात्री १०.३० वाजता प्रसारित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावेळेत प्रसारित होत असलेली अबोली ही मालिका बंद होणार का अशी चर्चा पाहायला मिळत आहे. आता नवीन मालिकेच्या येण्याने जुन्या मालिकांना डच्चू दिला जातो हे एक समीकरण आहे. पण असे असले तरी अबोली ही मालिका एक्झिट घेत नसल्याचे समोर आले . घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमुळे आई कुठे के करते या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला होता तसाच बदल अबोली मालिकेच्या बाबतीत केला जाणार आहे.
२७ मे पासून अबोली ही मालिका दुपारच्या वेळेत प्रसारित होईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनी त्यांच्या मालिका वाढवताना दिसत आहेत. कारण अबोली ही मालिका टीआरपीमध्ये टॉप ९ च्या स्थानावर आहे. स्टार प्रवाहच्या बहुतेक सर्वच मालिका टॉप १५ च्या आत आहेत. झी मराठीची पारू ही मालिका स्टार प्रवाहला तगडी टक्कर देताना दिसत आहे. त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनी आहे त्या मालिका टिकवून ठेवून आहे सोबतच नवीन मालिकेची एन्ट्री देखील करत आहे. आता प्रेक्षक या नवीन मालिकेला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.