news

नवरी मिळे हिटलरला मालिकेतील अभिनेत्रीला मातृशोक….गेल्या २ महिन्यांपासून प्रार्थना करा म्हणत आईची मृत्यूशी झुंज अपयशी

नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील फाल्गुनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री भालेकर हिला मातृशोक झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून धनश्रीची आई आजारी होती. अखेरच्या दिवसांत त्यांना प्रकृती बिघडल्याने आयसीयूमध्ये दाखल केले होते. आईच्या खालावलेल्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून तिने तिच्या चाहत्यांना प्रार्थना करण्यास सांगितले होते. पण या आजाराशी त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरलेली पाहायला मिळाली. धनश्रीने मराठीसह हिंदी मालिकांत देखील काम केले आहे. माझी तुझी रेशीमगाठ, तुझेच मी गीत गात आहे, मेरे साई, सोनी भाग रही है, त्रिदेवीयां अशा मालिकांमध्ये ती महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.

dhanashri bhalekar with mother
dhanashri bhalekar with mother

आईच्या आठवणीत भावुक झालेल्या धनश्रीने एक पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, “आई… I miss you अगं. आज 8 दिवस झाले पण मला अजूनही हे मान्यच करता येत नाहीये की तू आमच्यात नाही आहेस. I need you the most, खूप एकटी पडले आहे ग मी आई. माझ्याशी बोलायला, share करायला कोणीच नाहीय, मला हवी आहेस तू, मी नाही राहू शकत आहे तुझ्याशिवाय. तुझं नसणं म्हणजे माझ्यामध्ला एक भाग वगळल्यासारखं आहे. माझ्या आयुष्यातलं motivation हरवलं आहे, Incomplete feel करते आहे खुप. किती particular असतं तुझं सगळं, तुझं perfection आणि super hygiene खुप miss करते मी. मला तुझ्याबरोबर खूप बोलायचं आहे, मी सगळं कोणाला सांगू, कोणाबरोबर गप्पा मारत बसू ? असं वाटतंय तू आहेस cricket match बघताना खुश होशील, सगळ्या serial च्या stories सांगशील मला घरी आल्यावर.

actress dhanashri bhalekar mother
actress dhanashri bhalekar mother

किचन मध्ये आहेस, येशील माझा favourite पदार्थ बनवून आणि मी बाहेरुन घरी आल्यावर देशील मला खायला, घराबाहेर पडताना bye करायला दाराबाहेर आणि खिडकीत येशील. मला खुप आठवण येते आहे ग तुझी, blank झाले आहे मी, तुझ्याशिवाय काय करावं सुचत नाही आहे… मला माहिती आहे तू ऐकत आहेस, बघत आहेस, तुझा लक्ष आहे माझ्यावर. मी promise करते आई तुला दिलेले commitments आणि तू पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. तू आता जिथे आहेस तिथून मला आशीर्वाद दे आणि तू तूझी काळजी घे आणि प्रत्येक जन्मात माझी आई म्हणून तूच ये. खुप खुप प्रेम. Love you आई.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button