कलाकारांच्या आयुष्यात काय घडतं हे सोशल मिडियाच्या माध्यमातून नेहमी समोर येत असतं. काही दिवसांपूर्वीच पारू मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनवणे हिने तिच्या एक वर्षापूर्वी झालेल्या लग्नाची बातमी शेअर केली होती. शरयूचे एक वर्षापूर्वीच लग्न झालंय हे पाहून मात्र सगळ्यांना आश्चर्यकारक वाटले होते. आता अशीच एक बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहे. या मालिकेची नायिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक हिने असाच एक फोटो शेअर करून सगळ्यांना बुचकळ्यात पाडलं आहे. झालं असं की अक्षयाने चहा पित असताना एक फोटो शेअर केला पण या फोटोत तिने बेबी बम्प फ्लॉन्ट केलेला पाहायला मिळाला.
अर्थात अक्षयाचे लग्न झालेले नाही ती अजूनही सिंगलच आहे पण तिच्या या फोटोमुळे तिचे चाहते मात्र प्रश्नांकित झालेले आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर ‘तुझं लग्न कधी झालं?… तू प्रेग्नंट आहेस का?… गुड न्यूज पेढा की बर्फी?…’ अशा प्रश्नांनी तिचा कमेंटसेक्शन भरला आहे. पण हो हे प्रश्न पाहून अक्षयाने लगेचच त्यांना उत्तर देऊन शांत केलं आहे. अर्थात हा फोटो कुठल्यातरी सेटवरचा आहे आणि ती त्या पात्रामध्येच असल्याने चहा पित असताना एका निवांत क्षणी तिने हा फोटो कॅमेऱ्यात कैद केला आहे. ‘सबको करुंगी हाय , थंडी हो या गरमी रोज पिउंगी चाय’ असे तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे. सोबतच चाहत्यांना पडलेल्या प्रश्नांचीही तिने उत्तरं देताना म्हटले आहे की, “कुठलेही तर्क वितर्क लावणे थांबवा. हा फोटो मी करत असलेल्या एका पात्राचा आहे …शूटिंगच्या सेटवर असलेला हा फोटो आहे यामध्ये मी प्रेग्नंट असल्याचे दाखवले आहे”…तेव्हा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका असे स्पष्टीकरण अक्षयाने तिच्या चाहत्यांना दिले आहे.
दरम्यान अक्षया पॉकेट एफएम पॉडकास्टच्या एक लडकी को देखा तो साठी हे पात्र साकारत आहे. अनिका असे तिच्या कॅरॅक्टरचे नाव आहे असे सांगण्यात येत आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेनंतर अक्षया आता लवकरच या नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान तिच्या प्रेग्नन्सीच्या फोटोवर तिनेच आता हा खुलासा केल्याने तूर्तास तरी कमेंट्सचा पाऊस थांबलेला पाहायला मिळत आहे.