serials

स्टार प्रवाहची ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप…नव्या मालिकेच्या एन्ट्रीने जुन्या मालिकेला डच्चू

स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठी आणि आता सोनी मराठी या वाहिन्या मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालेल्या आहेत. या सर्व वाहिन्या मोठमोठ्या कलाकारांना घेऊन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. कलर्स मराठी वाहिनीने गेल्या काही दिवसात एकापाठोपाठ एक अशा चार नवीन मालिका दाखल केल्या. तर झी मराठी वाहिनीनेही अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. तर सोनी मराठी वाहिनीवर लवकरच सुबोध भावेची एन्ट्री होणार आहे. या सर्व वाहिन्यांमध्ये मात्र स्टार प्रवाह वाहिनीने टीआरपी टिकवून ठेवलेला पाहायला मिळतो. कारण लवकरच या वाहिनीवर अभिनेत्री शिवानी सुर्वे हिची एन्ट्री होत आहे. थोडं तुझं थोडं माझं! या मालिकेतून शिवानी सुर्वे पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीची नायिका बनणार आहे.

tujhech mee geet gaat aahe serial news
tujhech mee geet gaat aahe serial news

आजच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. तो प्रोमो पाहून प्रेक्षकांनी शिवानी सुर्वे हिचं स्वागतच केलेलं पाहायला मिळालं. या मालिकेच्या एट्रीमुळे स्टार प्रवाहच्या एका मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे. थोडं तुझं थोडं माझं! ही नवीन मालिका येत्या १७ जूनपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. त्यामुळे अर्थातच रात्री ९ वाजता प्रसारित होत असलेली तुझेच मी गीत गीत गात आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे निश्चित झाले आहे. तुझेच मी गीत गात आहे ही मालिका आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. मंजुळाच वैदेही असल्याचं सत्य मल्हारला कळले आहे पण एका अपघातात मोनिका तिची दृष्टी गमावते असे ती सगळ्यांना भासवत आहे.

thod tujha thod majha serial poster
thod tujha thod majha serial poster

त्यामुळे मोनिकाच सत्य लवकरच उघड होईल आणि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल. दरम्यान मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतही सार्थक आणि आनंदीने एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. नुकतेच या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मालिकेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्यामुळे आनंदी आणि सार्थक सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेतायेत की काय अशी सुद्धा चर्चा पाहायला मिळत आहे. कारण थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या जोडीलाच येड लागलं प्रेमाचं ही नवीन मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button