news

ना नवीन फार्महाऊस ना नवीन गाडी….प्राजक्ता माळीने साइन केलेल्या डॉक्युमेंट बद्दल मोठा खुलासा

काल अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या सोशल अकाऊंटवर खास फोटो शेअर केले होते. या दोन फोटोंमध्ये ती आई सोबत बसलेली पाहायला मिळाली. तर काही महत्वाच्या डॉक्युमेंटवर ती सही करताना त्यात दिसली. प्राजक्ताने या फोटोला कॅप्शन मध्ये काहीतरी महत्वाची घोषणा करणार असे म्हटले होते. पण हो हे रजिस्टर मॅरेज नाही असेही तिने अधोरेखित केले. अर्थात तिच्या या नव्या फोटोवर अभिनंदनाचा पाऊस पडलाच पण प्राजक्ता नवीन घर घेतेय असे अनेक तर्क तिच्या चाहत्यांनी लावलेले पाहायला मिळाले. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांच फार्महाऊस खरेदी केल होत. हे फार्महाऊस खरेदी करण्यासाठी तिने सर्व जमपुंजी पणाला लावली होती. हे कर्ज फेडण्यासाठी नवीन प्रोजेक्ट स्वीकारावे लागतात असेही म्हणत तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

Phullwanti prajakta mali upcoming project
Phullwanti prajakta mali upcoming project

मात्र आता प्राजक्ता काहीतरी खास करणार असे काल दिलेल्या तिच्या फोटोवरून लक्षात आले. ना नवीन घर ना कुठली नवीन गाडी पण प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोचा आता एक खुलासा झालेला आहे. फुलवंती या बिग बजेट चित्रपटातून प्राजक्ता माळी प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. आजच तिने या तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल खुलासा केला आहे. “फुलवंती” हा एक बिग बजेट चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले त्यात ढोलकीचे चित्र दाखवण्यात आले आहे. यावरून फुलवंती हा तमशाप्रधान चित्रपट असणार हे निश्चित झाले आहे. प्राजक्ता माळीसाठी हा एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कारण स्नेहल तरडे हिच्या दिग्दर्शनाखाली ती प्रथमच काम करणार आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रवीण तरडे करणार आहे. पॅनोरमा स्टुडिओने आजवर दृश्यम, ओंकारा, शैतान आणि यासारख्या ६५० हुन अधिक हिंदी, मराठी, पंजाबी, गुजराती भाषिक चित्रपोटासाठी काम केले आहे. या स्टुडिओ अंतर्गत प्राजक्ताचा हा आगामी चित्रपट बनवला जात आहे. ‘पेशवाई थाट, संगीत आणि नृत्य अशा तिन्हींचा संगम असणाऱ्या चित्रपटासाठी प्राजक्ता खूपच उत्सुक आहे.

तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहुद्या असे प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना म्हटले आहे. आजच्या चित्रपटाच्या घोषणेवरून कालच्या तिच्या पोस्टचा संदर्भ लागलेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचे तर्क आता चुकलेले पाहायला मिळत आहेत. प्राजक्ताची प्रमुख भूमिका असलेला फुलवंती हा चित्रपट लवकरच चित्रित करण्यास सुरुवात होईल असे जाहीर करण्यात आले आहे. प्राजक्ता माळीसह अभिनेत्री स्नेहल तरडे सुद्धा या आगामी प्रोजेक्ट साठी खूपच उत्सुक आहे कारण स्नेहल तरडे पहिल्यांदाच या चित्रपटातून दिग्दर्शिका म्हणून पादर्पण करत आहे. या नवीन प्रोजेक्टसाठी दोघींचेही अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button