serials

मोठ्या चिंधीच्या भूमिकेत असलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं … आहे खूपच प्रसिद्ध चेहरा

कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई ही मालिका लवकरच अनेक वर्षांचा लीप घेणार आहे. मालिकेत चिंधीचा प्रवास आता सिंधू पर्यंत जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे अनेक बदल या मालिकेत घडून आलेले पाहायला मिळणार आहेत. आतापर्यंत या मालिकेत चिंधीच्या शिक्षणाबद्दलचा प्रवास अनुभवला त्यात तिला तिच्या वडिलांची साथ मिळाली. आई , आजी, काकाचा विरोध असूनही चिंधी शाळेत शिकू लागली ती केवळ तिच्या वडीलांमुळे . पण आता मालिकेत चिंधीच्या लग्नाचा घाट घातला जात आहे. बालकलाकार अनन्या टेकवडे हिने चिंधीची भूमिका सुरेख वठवली होती. योगिता चौक, प्रिया बेर्डे, किरण माने यांनी या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यात आता चिंधीच्या सासूच्या भूमिकेत विद्या सावळे यांची एन्ट्री झाली आहे तर अतुल आगलावे पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.

sindhutai mazi maai gostha chindhichi
sindhutai mazi maai gostha chindhichi

मालिकेत चिंधीचं लग्न होणार आहे त्यानंतर मालिका अनेक वर्षांचा लीप घेत आहे. मालिकेतली चिंधी आता मोठी झाली आहे. तिची एक पुसटशी झलक वाहिनीने दाखवली आहे. त्यामुळे चेहरा लपवलेली ही चिंधी अर्थात सिंधू नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. पण यावरचे उत्तर तुम्हाला मिळाले असेलच. कारण फोटो दडलेली ही सिंधू थोड्याफार प्रमाणात अभिनेत्री दीप्ती लेले सारखी दिसत आहे याचा अंदाज जाणकार प्रेक्षकांनी लावला आहे. तर काहींच्या मते ही अभिनेत्री शिवानी सोनार आहे असा शिक्कामोर्तब केला आहे. पण जर हा फोटो तुम्ही नीट पाहिला आले तर या चेहऱ्याशी शिवानी सोनारचा चेहरा मिळताजुळता वाटत आहे. त्यामुळे सिंधुताईंच्या भूमिकेत आता तुम्ही शिवानी सोनारलाच पाहणार आहेत हे निश्चित सांगितले जात आहे.

actress shivani sonar in sindhutai mazi maai serial
actress shivani sonar in sindhutai mazi maai serial

शिवानी सोनार सिंधुताईंची व्यक्तिरेखा उत्तम निभावू शकते हे तिच्या अभिनयाने दाखवून दिले आहे. राजा राणीची गं जोडी या मालिकेतून शिवानीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेनंतर शिवानी पुन्हा एकदा कलर्स मराठीवरील मालिकेतूनच प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. अतुल आगलावे सोबत ती प्रथमच प्रमुख भूमिका साकारत आहे त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री कशी जुळून येते हे पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. दरम्यान ही एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत असल्याने शिवानी सोनार खूपच उत्सुक आहे. आता हे नवीन पर्व तुम्हाला लवकरच मालिकेतून पाहायला मिळेल पण त्यासाठी चिंधीच्या लग्नाची वाट पहावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button