serials

सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या ह्या ५ मराठी मालिका… कथानक चांगले असूनही तेजश्री प्रधानच्या मालिकेकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ

स्टार प्रवाह वाहिनी गेली तीन वर्षे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवत आहे. या वाहिनीवर नव्या मालिका दाखल झाल्या आहेत तर अगोदरच्या मालिका देखील टीआरपीच्या स्पर्धेत टॉप दहाच्या यादीत स्थान टिकवून ठेवून आहेत. नुकताच मराठी मालिकांचा टीआरपीचा अहवाल प्रेक्षकांच्या समोर आला असून या स्पर्धेत कोणत्या मालिकेने बाजी मारली हे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरापासून ठरलं तर मग मालिकेने आपले अव्वल स्थान टिकवून ठेवलेले पाहायला मिळते. ठरलं तर मग ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. काहीच दिवसांपूर्वी या वाहिनीवर प्रेमाची गोष्ट ही मालिका दाखल झाली होती. तेजस्वी प्रधानची मालिका ठरलं तर मग या मालिकेला मागे टाकणार असे बोलले जात होते.

premachi gostha marathi serial
premachi gostha marathi serial

पण जशी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तसे या मालिकेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली. तगडे कलाकार आणि तगडे कथानक असूनही प्रेक्षकांना या मालिकेत काहीतरी खटकलं त्यामुळे टीआरपीच्या रेसमध्ये मालिकेची पीछेहाट झाली. मालिकेचा नायक नायिकेपेक्षा वयाने खूप लहान दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. शिवाय शुभांगी गोखले या एक उत्तम अभिनेत्री आहेत पण या मालिकेत त्यांना बालिश दाखवण्यात आले आहे. याच कारणास्तव मालिका मागे पडली असे तर्क लावण्यात येत आहेत. त्याच जोडीला आता ठरलं तर मग मालिकेत अर्जुनबानी सायलीचे प्रेम हळूहळू खुलताना दिसू लागले आहे. खऱ्या तन्वीचा शोध सुरू असताना अर्जुनचे सायलीच्या प्रेमात गुंतत जाणे प्रेक्षकांना आवडू लागले आहे. त्यामुळे ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांनाही विशेष भावली आहे.

top marathi serials
top marathi serials

स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेने टीआरपी स्पर्धेत ६.७ रेटिंग मिळवले आहेत तर तुझेच मी गीत गात आहे मालिका दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेला अजूनही तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागत आहे. तर चौथ्या नंबरला सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने बाजी मारली आहे. आई कुठे काय करते मालिकेचा टीआरपी खाली घसरला असून या मालिकेला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागत आहे. ठिपक्यांची रांगोळी नंतर मन धागा धागा जोडते नवा ही मालिकाही प्रेक्षकांच्या मनात जागा बनवत आहे. मालिकेतील रंज घडामोडी टीआरपीचा रेट वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या आश्चर्यकारक ट्विस्टमुळे ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर येऊ पोहोचली आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेलाही तिने मागे पाडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button