news

श्वास नंतर २० वर्षाने झाला इतका बदल कि…समोर उभा असूनही अरुण नलावडे यांनी अश्विनला ओळखलेच नाही

२००४ साली प्रदर्शित झालेला श्वास हा चित्रपट मराठी सृष्टीतील एक यशस्वी चित्रपट गणला जातो. या चित्रपटाचे नाव ऑस्करसाठी सुचवण्यात आले होते. राष्ट्रीय पुरस्काराने चित्रपटाला आणि बालकलाकार अश्विन चितळेला गौरविण्यात आल्याने हा चित्रपट खूप चर्चेत राहिला होता. चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास २० वर्षे होत आहेत. तब्बल २० वर्षानंतर एका मुलाखतीच्या माध्यमातून चित्रपटातील बालकलाकार अश्विन चितळे आणि आजोबांची भूमिका साकारणारे अरुण नलावडे यांची भेट घडून आली. श्वासचे हे रियुनियन पाहून कलाकारांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. अरुण नलावडे या चित्रपटानंतर अश्विनला भेटलेच नव्हते. त्यामुळे तो आता कसा दिसतो काय करतो याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.

arun nalawade and ashwin chitale in shwas movie
arun nalawade and ashwin chitale in shwas movie

उलट अश्विन समोर असतानाही अरुण नलावडे त्याला ओळखू शकले नाहीत. लहानपणी अंगाखांद्यावर बसून शूटिंग केलेला हा चिमुरडा आता आपल्या समोर उभा आहे याची कल्पना अरुण नलावडे यांना नव्हती. उलट तेच अश्विन कुठे आहे? म्हणून विचारू लागले, तेव्हा समोर असलेल्या अश्विनला पाहून अरुण नलावडे चकित झाले. श्वास हा चित्रपट आजोबा आणि नातवाच्या नात्याभोवती फिरणारा चित्रपट आहे. रेटिना कॅन्सर झालेल्या नातवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन फिरणाऱ्या आजोबांची तळमळ अरुण नलावडे यांनी सुरेख वठवली होती. अरुण नलावडे यांनी या चित्रपटात परशुरामच्या आजोबांची भूमिका साकारली होती तर अश्विन नातवाच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या ३० दिवसात सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई, केईएम हॉस्पिटलमध्ये पार पडले होते.

ashwin chitale ashwin afraad
ashwin chitale ashwin afraad

चित्रपटात अश्विन बऱ्याचदा अरुण नलावडे यांच्या कडेवर बसलेला दाखवला होता. पण आता तो इतका बदललाय हे पाहून अरुण नलावडे यांनी त्याला सुरुवातीला ओळखलेच नव्हते. कारण मी त्याला या २० वर्षात परत कधीच भेटलो नव्हतो त्यामुळे तो आता कसा दिसतो हे मला माहीतच नव्हते आहि प्रतिक्रिया अरुण नलावडे या मुलाखतीत देतात. श्वास चित्रपटाच्या आठवणी सांगताना अरुण नलावडे म्हणतात की, श्वास हा संपूर्ण चित्रपट निगेटिव्हवर शूट करण्यात आला होता. जसाच्या तसा चित्रपट शूट केल्यामुळे साऊंडवर सहा महिने काम करावे लागले होते. तशाही परिस्थितीत आम्ही ते डायलॉग मी ,अश्विन आणि अमृता सुभाषने म्हटले होते. याची गंभीरता त्यावेळी कळली नव्हती. आताच्या घडीला प्रगत तंत्रज्ञानामुळे या सर्व गोष्टी सहजसोप्या झाल्या आहेत असे अरुण नलावडे अधोरेखित करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button