news

लागीरं झाली जी फेम अभिनेत्याने जिंकलं गोल्ड मेडल … महाराष्ट्र स्टेट पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मिळवलं सुवर्ण पदक

झी मराठीवरील लागीरं झालं जी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेत टॅलेंटचे विरोधी पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याने पुढे जाऊन अनेक मालिका चित्रपटातून काम केले. कारभारी लयभारी, फकाट, टोटल हुबलाक, चला हवा येऊ द्या मध्ये महेश जाधवने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. पण या प्रवासात त्याला बरेच चांगले वाईट अनुभव मिळाले. खरं तर उंची कमी असल्याकारणाने आपल्याकडे अशा माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे महेशकडे कायम विनोदी पद्धतीनेच पाहिले गेले. ही लोकं फक्त विनोदी भूमिकाच करू शकतात किंवा एखाद्या सर्कशीत काम करू शकतात असा समज असतो. पण हाच जोकर कधीकधी पत्त्यांच्या डावात विजेता बनवू शकतो, महेश जाधवने कधीच या विजयाची कल्पना त्याच्या आयुष्यात केली नव्हती.

actor mahesh jadhav
actor mahesh jadhav

आपणही पत्त्यातला जोकर आहोत आणि आपल्या अभिनयाच्या ताकदीवर आपण प्रेक्षकांची मनं जिंकून घेऊ शकतो हा विचार त्याने कधीच केला नव्हता. पण टॅलेंटच्या भूमिकेने त्याला हा विश्वास मिळवून दिला. पण हो या प्रवासात आता महेशने अभिनय क्षेत्रातच नव्हे तर आता पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतही मानाचा तुरा खोवला आहे. महाराष्ट्रात झालेल्या द्वितीय पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२३- २४मध्ये महेशने सहभाग दर्शवला होता. काल कल्याणमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात महेशने प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल जिंकलं आहे. या स्पर्धेमागची मेहनत कशी होती हे सांगताना महेश भावुक होऊन म्हणतो की, “शाळेत प्रार्थनेच्या रांगेत नं. 1 ला उभा ‘Height’ मुळे आज तुमच्यासमोर हे Gold घेऊन उभा ‘Fight ‘ मुळे” आज तुम्हाला सांगायला आनंद होताये की 2nd Maharashtra State Para Powerlifting Championship 2023- 24 काल कल्याण येथे झाली.

mahesh jadhav lagir jhal ji fame
mahesh jadhav lagir jhal ji fame

त्यामध्ये Men’s 49Kg मध्ये मी Gold मेडल मिळवले. यामागे खुप मेहनत तर आहेच पण त्याचबरोबर खुप लोकांचा सल्ला, मार्गदर्शन पण आहे यात मला माझे Trainer कलीम सय्यद सर ,माझा मित्र विनोद तावरे याचे खूप सहकार्य मिळाले.तसेच एखाद्या खेळाडूला Practice,Workout बरोबर Diet पण खुप important असतो तशी माझी हे खा हे खाऊ नको बघणारी डॉ पूर्णिमा डे ,आणि मला कायम सपोर्ट करत आलेला खुप मोठ्ठंसा मित्रपरिवार ,या सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि तुम्ही प्रेक्षक कायम माझ्यावर प्रेम करत आला आहात तर ही दुसरी Innning तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button