आप्पी आमची कलेक्टर मालिकेने घेतला लिप…मुलाच्या भूमिकेत झळकणार आमच्या पप्पानी गणपती आणलाचा प्रसिद्ध रीलस्टार

झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आता काही वर्षे लिप घेत आहे. त्याअगोदर या मालिकेत बऱ्याच घडामोडी घडलेल्या पाहायला मिळत आहेत. अर्जुन अप्पीवर नाराज असून तो घर सोडून वडिलांसोबत वेगळा राहायला लागला आहे. आईच्या मृत्यू मागे सरकारचा हात आहे आणि हे अप्पीला ठाऊक असूनही तिने याबाबत आपल्याला काहीच सांगितलं नाही म्हणून अर्जुन घर सोडून निघून गेला आहे. अप्पी आणि अर्जुनाला त्यांचे बाळ परत मिळते हा आनंद त्यांच्या आयुष्यात आल्यानंतरही त्यांच्या मागे दुःखाचा पाठलाग सुरू आहे..अशातच आता मालिकेने काही वर्षांचा लिप घेतल्याने कथानकाला रंजक वळण मिळाले आहे. अमोल हा अर्जुनचा मुलगा पण आता रुपाली आणि अर्जुनचा भाऊ त्यांच्यासोबत राहायला लागले आहेत.
अमोलची जबाबदारी अप्पी घेणार असून ती त्याचे पालनपोषण करते. त्यामुळे वडिलांपासून वेगळा राहत असलेला आता हा अमोल पुढच्या काही भागातच मोठा झालेला दाखवणार आहे. त्यात आता अर्जुन आणि अप्पी देखील आपापल्या कामात यशस्वी झालेले दाखवणार आहेत. मालिकेत हा ट्विस्ट दाखवल्याने प्रेक्षकांनी या ट्विस्टचे स्वागतच केले आहे. येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून मालिकेचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यात अमोलच्या भूमिकेत तुम्हाला प्रसिद्ध रीलस्टार साईराज केंद्रे पाहायला मिळणार आहे. आमच्या पप्पाने गंपती आणला…या एका रील मुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला साइराज आता मालिका सृष्टीत चमकणार आहे. अभिनयाची कुठलीही पर्शवभूमी नसताना साइराजवर प्रेक्षकांनी प्रेम दाखवलं आहे. त्याचे हावभाव पाहूनच तो या मालिकेत अमोल ची भूमिका उत्तम निभावणार असा प्रेक्षकांना विश्वास आहे.

त्यामुळे साइराज मालिका सृष्टीत पदार्पण करतोय हे पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. याअगोदर साइराज एका गाण्यात मायरा वायकुळ सोबत झळकला होता. पण आता हाच साइराज झी मराठी सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अभिनयाची चुणूक दाखवताना दिसणार आहे. साइराज केंद्रे हा बीडचा.आई भाग्यश्री आणि वडील गणेश केंद्रे हे मोलमजुरी करून त्याच्या कलेला वाव मिळावा म्हणून इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर त्याचे टॅलेंट दाखवू लागले. यातून एक दिवस त्याने आमच्या पप्पाने गंपती आणला गाण्यावर रील शूट केले. आणि रातोरात हा चिमुरडा लोकांच्या मनात घर करून गेला. अवघ्या काही दिवसातच कोट्यवधी लोकांनी त्याचा हा व्हिडीओ पाहिला. त्यामुळे साइराज हे नाव घराघरात पोहोचले आता हाच साइराज मालिका विश्वात पदार्पणसाठी सज्ज झाला आहे. अभिनय क्षेत्रात त्याला नक्कीच यश मिळेल हीच सदिच्छा.