रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेत्रीचा नुकताच झाला साखरपुडा… साखरपुड्याचे फोटो होत आहेत व्हायरल

मराठी सृष्टीत एकीकडे कलाकारांची लगीनघाई सुरु आहे तर काहींनी साखरपुडा करून आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर तावडे यांचा मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर अभिनेता चेतन वडनेरे आणि ऋजुता धारप यांनी नाशिकमध्ये मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली. तर नुकतेच रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेत्रीने मोठ्या थाटात साखरपुडा करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सोनाली साळुंखे ही गेली अनेक वर्षे मालिका क्षेत्रात काम करत आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत तिने एक विरोधी पात्र साकारले होते. छोट्या मोठ्या भूमिका साकारणाऱ्या सोनालीने नाटकातून अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरु केला होता. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातून तिने येसूबाईचे प्रमुख पात्र निभावले होते. यातुनच सोनालीला मालिका सृष्टीत येण्याची संधी मिळाली. क्रिमीनल्स चाहूल गुन्हेगारांची, गाथा नवनाथांची, या मराठी मालिकांसह तीने क्राईम पेट्रोल, चुस्की जिंदगी की, विघ्नहर्ता गणेशा अशा हिंदी मालिकेतून अभिनयाची छाप पाडली आहे.

छोट्या बायोची मोठी स्वप्नं या मालिकेत तिने हेतलचे अतरंगी पात्र साकारलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनालीने साखरपुडा केला. पण यावेळी तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव रिव्हील करणे टाळले आहे. पण या गोड बातमीवर सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. आता सोनाली लग्न कधी करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे.