marathi tadka

‘आमचं ठरलंय हा’ म्हणत अभिनेता प्रथमेश परबने केळवणाचे फोटो केले शेअर…. लग्नाची तारीख आहे खूपच Special

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेता प्रथमेश परबने लग्न करणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. “प्रतिजाचं ठरलंय हं!” असे म्हणत प्रथमेशच्या पहिल्या वहिल्या केळवणाने त्याच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रथमेश परब गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर हिच्या प्रेमात असल्याचे जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता जवळपास दोन वर्षाने हे दोघे विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. लग्नाची तारीख लवकरच कळवतो असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. पण ही तारीख कोणती असेल असाही प्रश्न त्यांनी त्यांच्या चाहत्यांना विचारला आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२४ व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी प्रथमेश आणि क्षितिजा विवाहबद्ध होतील असे तर्क अनेकांनी लावले आहेत.

prathmesh parab and kshitija ghosalkar wedding kelvan photos
prathmesh parab and kshitija ghosalkar wedding kelvan photos

त्यामुळे हे दोघेही व्हॅलेन्टाईनलाच लग्न करतील अशी खात्री देण्यात येत आहे. दरम्यान प्रथमेश आणि क्षितिजाच्या लग्नाच्या बातमीने सेलिब्रिटींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. प्रथमेश परब हा गेली अनेक वर्षे मराठी चित्रपट सृष्टीत कार्यरत आहे. टाईमपास चित्रपटातील दगडूच्या भूमिकेने त्याला विशेष ओळख मिळवून दिली आहे. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचा नायक म्हणून उर्फी, टकाटक अशा चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डिलिव्हरी बॉय हा त्याचा आगामी चित्रपट आहे जो ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तर क्षितिजा ही उच्च शिक्षित आहे. बायोटेक्नॉलॉजी मध्ये तिने मास्टर्स केलं आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि लँग्ज कॅन्सरवर तिने प्रोजेक्ट बनवले आहेत.

prathmesh parab and kshitija ghosalkar wedding kelvan photos
prathmesh parab and kshitija ghosalkar wedding kelvan photos

त्यानंतर ती सामाजिक बांधिलकी जपावी म्हणून आपला संपूर्ण वेळ तिने एनजीओला देण्याचे ठरवले आहे. करिअर म्हणून तिने आता कोटक एज्युकेशन फाउंडेशन या सामाजिक संस्थेची निवड केली आहे . याशिवाय क्षितिजाला लिखानाचीही आवड आहे .अनस्पोकन हॅशटॅग या माध्यमातून क्षितिजा तिच्या चाहत्यांना प्रेरणा देत असते. प्रथमेश आणि क्षितिजा दोघेही कॉलेजपासूनचे मित्र त्यामुळे इतक्या वर्षांच्या मैत्रीला आता त्यांनी नात्याच्या बंधनात अडकवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथमेश आणि क्षितीजाच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे , त्यामुळे आतापासूनच त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button