news

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीचा नुकताच झाला साखरपुडा

शाळा चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर हिचा साखरपुडा संपन्न झाला आहे. काल ३१ डिसेंबर २०२३ वर्षाच्या अखेरीस “एका नव्या अध्यायाची सुरुवात करते” असे म्हणत कौमुदीने आकाश चौकसे सोबत साखरपुडा केल्याचे जाहीर केले आहे. वर्षाच्या अखेरीस मराठी सृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकलेले पाहायला मिळाले. याच्याच जोडीला आता आई कुठे काय करते मालिकेतील आरोहिने खऱ्या आयुष्यात साखरपुडा करून सगळ्यांना एक सुखद धक्काच दिला आहे..मालिकेत आरोही आणि यश लवकरच विवाहबद्ध होत आहेत. त्या दोघांचे लग्न व्हावे अशी प्रेक्षकांची देखील ईच्छा आहे. यश आरोहीसोबत एकनिष्ठ राहील असेही तो अरुंधतील वचन देत आहे.

aakash and kumudini wedding engagement photos
aakash and kumudini wedding engagement photos

त्यामुळे अखेर यशचे लग्न होणार म्हणून मालिकेच्या प्रेक्षकांनी निश्वास टाकला आहे. मात्र रीललाईफ लग्न होण्यागोदरच आरोहिने रिअल लाईफमध्ये तिचा जोडीदार निवडला आहे. आरोहिची भूमिका अभिनेत्री कौमुदी वलोकर हिने निभावली आहे. काल ३१ डिसेंबर २०२३ रोजी वर्षाच्या अखेरीस “एका नव्या अध्यायाची सुरुवात करते” असे म्हणत कौमुदीने आकाश चौकसे सोबत साखरपुडा केल्याचे जाहीर केले आहे. साखरपुड्याचे काही खास क्षण आरोहिने सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. या साखरपुड्याला कौमुदीची खास मैत्रीण ऋतिका क्षोत्री हिने हजेरी लावली होती. आकाश चौकसे हा पीएचडी धारक असून शिक्षण घेण्यासाठी तो कॅलिफोर्निया येथे गेला होता.

actress Kaumudi Walokar
actress Kaumudi Walokar

कौमुदी वलोकर हीने शाळेत असल्यापासूनच नाटकातून सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग दर्शवला होता. २०११ साली शाळा या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. शटर, मी वसंतराव, तुझ्या माझ्यात, वाय झेड अशा चित्रपटातून कौमुदीने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. देवाशप्पथ या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत ती आरोहिची भूमिका साकारत आहे. मालिकेत आरोहि आणि यश यांच्या लग्नाची तयारी लवजरच पाहायला मिळणार आहे. पण त्याअगोदर कौमुदीने खऱ्या आयुष्यात साखरपुडा करून हा आनंद सगळ्यांसोबत शेअर केला आहे. कौमुदीने ज्याच्याशी साखरपुडा केला त्या आकाशने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘आरोहिचा खरा यश ‘ असे कॅप्शन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button