news

प्रसाद ओक याने केलं नव्यावर्षात नव्या घरात प्रवेश… व्हिडिओ शेअर करत दाखवली नव्या घराची झलक

एक उत्तम अभिनेता तसेच धाडसी सिनेमे तयार करणारा निर्माता म्हणून त्याने आपला ठसा उमठवला आहे. अभिनयासोबतच सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिका निभावणारा प्रसाद बंदिनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पाहायला मिळाला होता. दामिनी, असंभव, पिंपळपान, आभाळमाया, अवघाची संसार, वादळवाट, होणार सून मी ह्या घरची, फुलपाखरू अशा अनेक मराठी मालिकेतून प्रसाद ओक महत्वाच्या भूमिका निभावताना दिसला. तर हिरकणी, फुल धमाल, धुरळा, पिकासो, फर्जंद असे अनेक चित्रपट त्याने साकारले आहेत याच शिवाय शिवाय हिरकणी, कच्चा लिंबू आणि आगामी चंद्रमुखी यांचे दिग्दर्शनही केल हे आपणा सर्वाना माहित असेलच.

२०२४ ह्या नव्या वर्षात पदार्पण करताना त्याने चाहत्यांना आणखीन एक खुशखबर दिली आहे. ती खुशखबर म्हणजे आपल्या हक्काचं नवं घर. होय प्रसाद ओक ह्याने नव्यावर्षाच्या मुहूर्तावर आपल्या नव्या घरात प्रवेश केला आहे. त्याच हे घर त्याने उत्तमरित्या सजवलेलं पाहायला मिळत आहे. ओक ११०२ आणि ११०३ असे २ फ्लॅट स्टाईलिश नावाच्या पाटीत पाहायला मिळत आहेत. ह्या व्हिडिओमध्ये प्रसाद सोबत त्याची पत्नी मंजिरी आणि सार्थक व मयांक अशी २ मुले पाहायला मिळत आहेत. प्रसादच्या यशाचा हा प्रवास त्याची पत्नी मंजिरीने देखील जवळून अनुभवला आहे. मंजिरीला अभिनयाची आवड असल्याने सदानंदच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी प्रसाद एका नाटकासाठी मंजिरीला शिकवत होता. त्याच काळात हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. आज जवळपास २४ वर्षांच्या सुखी संसारात मंजिरी देखील हातभार लावताना दिसते. तंतुह या ब्रँड अंतर्गत तिच्या स्वतःच्या नावाने ओळखली जाणारी मंजिरी नथ सादर केली होती. प्रसादच्या अनेक कार्यक्रमांत मंजिरी आवर्जून हजेरी लावताना पाहायला मिळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button