serials

मुरांबा मालिकेतून अभिनेत्रीची अचानक एक्झिट…मालिकेतल्या ट्विस्टमुळे कथानकाला वेगळे वळण

स्टार प्रवाहवरील मुरांबा ही मालिका प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवत आहे. रमा आणि अक्षय यांचे नाते फुलू लागले असतानाच वेगवेगळ्या संकटांना त्यांना सामोरे जावे लागले आहे. आता तर अभिषेकच्या मदतीने ती घरात घुसू पाहत आहे. अभिषेक आणि आरती यांची या मालिकेत एक वेगळी स्टोरी आहे. अर्थाच्या येण्याने मुकादम कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. पण आता याच आनंदावर पुन्हा एकदा विरजण पडणार आहे. अर्थाच्या नामकरण सोहळ्याची आणि आरतीच्या आगमनाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण आता आरतीच्या जीवावर मोठं संकट येणार आहे. मालिकेत आरतीचा मृत्यू होतो असा एक ट्विस्ट आणला जात आहे.

kajal kate in muramba serial
kajal kate in muramba serial

त्यामुळे मालिकेला वेगळे वळण मिळणार आहे. आरतीच्या जाण्याने आता अर्थाची जबाबदारी रमा उचलत आहे. त्यात तिला अक्षयची साथ मिळणार का हे पाहावे लागेल. दरम्यान आरतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल काटे हिची या मालिकेतून एक्झिट झाली आहे. खरं तर अगोदर शाश्वती पिंपळीकर हिने ही भूमिका निभावली होती. पण खाजगी कारणास्तव शाश्वतीने या मालिकेतून काढता पाय घेतला होता. त्याजागी काजल काटे ची वर्णी लागलेली पाहायला मिळाली होती. अर्थात माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे काजल काटे प्रेक्षकांच्या घराघरात पोहीचली होती. या मालिकेने तिला चांगली लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे काजलला आरतीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते.

actress kajal kate latest news
actress kajal kate latest news

मुरांबा या मालिकेत तिची सहाय्यक भूमिका होती पण या भूमिकेनेही तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली. गेल्याच आठवड्यात काजलने तिचे शूटिंग पूर्ण करून मालिकेला निरोप दिला होता. मुरांबा मालिकेच्या सेटवरचे शेवटचे काही क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिची मालिकेतून एक्झिट झाली हे कळताच तिच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. अर्थात काजलच्या एक्झिटमुळे मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. आरतीच्या मुलीची जबाबदारी आता रमावर येऊन पडली आहे. ती हे आव्हान कसे पेलते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button