serials

अर्जुन दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर… पण सत्य समजताच सिम्बा बनणार आडकाठी

झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत रंजक घडामोडी घडत आहेत. सिंबा म्हणजेच अमोलला त्याच्या वडिलांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आपले वडील कोण, ते कसे दिसतात, कुठे असतात अशा प्रश्नांनी तो अपर्णाला भांडावुन सोडत आहे. एकीकडे सिंबाची ही उत्सुकता वाढलेली असतानाच अर्जुनने अप्पीला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली आहेत. त्याच्या इच्छेखातर अप्पी लवकरच त्याला या बंधनातून मुक्त करत आहे. अपर्णाने आपल्याला घटस्फोटाची कागदपत्र पाठवली असा अर्जुनचाही गौरसमज होतो. खरं तर या दोघांचा घटस्फोट व्हावा म्हणून रुपाली आणि मोना यांनी हा डाव रचलेला असतो. अप्पी पुन्हा या घरात यायला नको हा रुपालीचा डाव आहे.

simba appi amchi collector photos
simba appi amchi collector photos

त्यात तिला मोनाची साथ मिळाली आहे. त्यामुळे या दोघी परस्पर बनाव करून घटस्फोटाची कागदपत्र पाठवण्यात यशस्वी झाली आहेत. दरम्यान यामुळे अर्जुनचा दुसरं लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्याच अर्जुनवर प्रेम आहे आणि ती अर्जुनची काळजी घेऊ शकते म्हणून या दोघांनी लग्न करावं असं अर्जुनच्या वडिलांना वाटतं. त्याप्रमाणे आता रुपाली सुद्धा जोरदार तयारीला लागली आहे. आर्याच्या घरच्यांशी बोलून अर्जुनसोबत लग्नाचा घाट घातला जात आहे. लवकरच मालिकेत अर्जुन आणि आर्याचा साखरपुडा होताना दिसणार आहे. मात्र हे लग्न होऊ नये यासाठी छोटा सिंबा तयारीला लागला आहे. अर्जुनच आपले वडील आहेत हे सत्य आता अमोलला कळणार आहे. साखरपुड्याच्या वेळी हा सिंबा डॅशिंग एन्ट्री करत अर्जुनचं आर्यासोबत लग्न कसं मोडतं याच तयारीला लागला आहे.

अर्जुन आणि अप्पी पुन्हा एकत्र येण्यासाठी आता सिंबाने कंबर कसली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये हा छोटा सिंबा सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसला. आई आणि बाबांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मालिकेचे पुढील भाग रंजक होणार आहेत. खरं तर या चिमुरड्याच्या एंट्रीनेच मालिका रंजक वळणावर येऊन ठेपली होती. साइराज केंद्रे या बालकलाकाराचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला आहे. त्यात आता साइराजची चलाखी सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button