serials

आज थोडं व्यक्त व्हावं वाटलं … पडले, धडपडले, पुन्हा उठले म्हणत अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर झाली व्यक्त

झी वाहिनी वरील अग्गबाई सासूबाई मालिकेतील प्रमुख अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची प्रमुख भूमिका असलेली प्रेमाची गोष्ट मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. एक अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान नेहमीच चर्चेत असते. तिची प्रत्येक मालिका काहीतरी वेगळं घेऊन येते आणि त्यातली तिची भूमिका प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात देखील राहते. होणार सून मी ह्या घरची मालिकेतील जानवी असो वा अग्गबाई सासूबाई मधील शुभ्रा प्रत्येक भूमिकेला ती न्याय देताना पाहायला मिळाली. तब्बल अडीच वर्षानंतर टेलिव्हिजनच्या दुनियेपासून दूर राहिल्यावर आता अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा पदार्पण केले आहे. त्यासाठी प्रेक्षकाना तिने खास शैलीत पोस्ट लिहली आहे. त्यात ती काय म्हणते पाहुयात….

tejashri pradhan in premachi gostha serial
tejashri pradhan in premachi gostha serial

अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणते “कसे आणि कुठल्या शब्दात आभार मानू? तब्बल अडीच वर्षानंतर television वर पुन्हा कामाची संधी मिळाली. तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि पटकन म्हणतं “आम्हाला तू आमच्या घरातलीचं वाटतेस tv मधे पाहिल्यावर” तेचं आपलं घरातलं माणूस अडीचं वर्षानंतर परत यावं , आपण त्याच्या गेल्या दिवसापासून परत येण्याच्या वाटेवर डोळे ठेवून रहावं, आणि घरी परतलेल्या “त्या” माणसाला तुमचे ते वाट पाहणारे डोळे पाहून भरूनचं यावं….तसचं काहीस माझ्या मनाचं झालयं , आज पहिल्या भागाला (episode ला) तुम्ही दिलेला प्रतिसाद कळल्यानंतर इतकी वर्ष कामावर श्रद्धा ठेवून सातत्याने तुमच्या समोर येत राहीले.

premachi gostha marathi serial cast
premachi gostha marathi serial cast

पडले, धडपडले, पुन्हा उठले .. आधाराला फक्त काम होतं… शाश्वत फक्त काम होतं , इतकी वर्ष त्याच कामाने मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही. आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाचं… सांगावसं वाटलं , “मला जाणीव आहे तुमच्या आयुष्यातल्या ‘त्या’ अर्ध्या तासाची, जो तुम्ही माझ्या नावावर करता, जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मियतेची आणि नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या ‘त्या’ अश्रुच्या थेंबाची.. जो कधी लक्ष्मी सीठी, कधी जान्हवी साठी, कधी शुभ्रासाठी आणि आता मुक्ता साठी ढळतो.. “ आणि हिचं जाणीव सातत्याने पोटतिडकीने काम करण्याचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे , या पुढे ही देत राहील पुन्हा एकदा … मनापासून आभार असेचं कायम माझ्या पाठीशी रहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button